विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ladki Bahin Yojana राज्यभरात अनेक लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नसल्याने काही ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरताना अनेक महिलांना ई-केवायसी संदर्भातील पर्याय निवडताना काही चुकीचे पर्याय निवडले गेल्याने अनेक महिलांचे पैसे थकले होते. परंतु, आता या महिलंनया दिलासा मिळणार असल्याचे समोर आले आहे. महिला व बाल विकास विभागाने ई-केवायसीचे पोर्टल पुन्हा सुरू केले असून ई-केवायसी दुरुस्ती आता 31 मार्चपर्यंत करता येणार आहे.Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेचे ई-केवायसी पोर्टल आजपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसीचे पोर्टल बंद असल्याने अनेक महिलांचे पैसे थकले होते. यामुळे लाडक्या बहीणींनी राज्यातील अनेक भागांमध्ये आक्रोश व्यक्त करत मोर्चे काढले होते. याची गंभीर दखल घेत राज्य महिला व बालविकास विभागाने आदेश काढ्हून पोर्टल सुरू केलए आहे. या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.Ladki Bahin Yojana
ई-केवायसीत चुकीचा पर्याय निवडल्याने संभ्रम
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी द्वारे आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, ही प्रक्रिया पार पाडताना अनेक महिलांकडून कुटुंबातील सदस्यांच्या सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतनाबाबतचा पर्याय निवडताना तांत्रिक चूक झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. कुटुंबातील कोणी सदस्य सरकारी विभाग, मंडळ किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेत नियमित/कंत्राटी कर्मचारी आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना चुकीचा पर्याय निवडल्या गेल्यामुळे अनेक पात्र महिलांच्या अर्जांबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
या त्रुटींमुळे लाभार्थी महिलांच्या पात्रतेची खात्री करण्यासाठी शासनाने 20 जानेवारी रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, ही पडताळणी प्रक्रिया अधिक जलद आणि सुटसुटीत व्हावी, अशी मागणी लाभार्थी महिला आणि क्षेत्रीय कार्यालयांकडून सातत्याने केली जात होती. प्रत्यक्ष पडताळणीमध्ये येणाऱ्या अडचणी आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनेच माहिती सुधारण्याची संधी देण्याची विनंती सरकारकडे करण्यात आली होती.
दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत
याची दखल घेत प्रशासनाने ई-केवायसी प्रक्रियेत बदल करण्याची पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिली आहे. ज्या महिलांनी माहिती भरताना चुकीचा पर्याय निवडला होता, त्यांना आता आपल्या अर्जात ऑनलाईन सुधारणा करता येणार आहे. ही दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली असून, यामुळे हजारो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
लाडक्या बहीणींचे 2100 रुपये करण्याचे महायुतीकडून आश्वासन
दरम्यान, आता जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता हा 14 जानेवारी रोजी लाडक्या बहीणींच्या खात्यात जमा झाला होता. आता जानेवारीचा देखील त्याच दरम्यान फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांकडून विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचार सभेत बोलताना लाडक्या बहीणींचे 2100 रुपये करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
Ladki Bahin Yojana e-KYC Portal Reopens: Correction Deadline March 31, 2026
महत्वाच्या बातम्या
- औद्योगिक क्षेत्रात विदर्भाची घोडदौड; ॲडव्हांटेज विदर्भ 2026 खासदार औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन
- रशियाने म्हटले- भारत इतर देशांकडून तेल खरेदीस मुक्त; यात काही चुकीचे नाही, पण रशियन तेल खरेदी थांबवल्याची माहिती नाही
- Actor Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादवने केले सरेंडर; चेक बाउंस प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आत्मसमर्पण
- वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द करायचा एकनाथ शिंदे यांचा निर्णय; शुभेच्छांचे होर्डिंग्ज आणि पुष्पगुच्छ पण नकोत!!