• Download App
    No Reduction in Ladki Bahin Beneficiaries: Minister Aditi Tatkare Refutes Claims VIDEOS लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याची माहिती चुकीची, मंत्री अदिती तटकरेंनी फेटाळला दावा

    Aditi Tatkare : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याची माहिती चुकीची, मंत्री अदिती तटकरेंनी फेटाळला दावा

    Aditi Tatkare

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Aditi Tatkare महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेची सुरुवात करण्यात आली व त्यानंतर विधानसभेत महायुतीला बहुमत मिळाले होते. मात्र, आता या योजनेची झळ सरकारी तिजोरीवर पडत असल्याचे बोलले जात असून लाभार्थी महिलांच्या संख्येत मोठी घट होणार असल्याचे देखील बोलले जात आहे. यावर महिला व बाल कल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत हे वृत्त फेटाळून लावले आहे.Aditi Tatkare

    अदिती तटकरे यांनी ट्विट करत म्हटले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या कपातीबाबत काही माध्यमांकडून प्रसारित करण्यात आलेल्या बातम्या चुकीच्या व तथ्यहीन आहेत. दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत लाडक्या बहिणींना E-Kyc kअरण्याची संधी देण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू असून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. तसेच या संदर्भात कोणतेही वृत्त प्रसारित करण्यापूर्वी माध्यमांनी तथ्यांची पडताळणी करावी, असे आवाहन तटकरे यांनी केले आहे.Aditi Tatkare



    दरम्यान, आधारशी लिंक केल्यानंतर E-Kyc तपासणी आणि आयकर व इतर डेटाबेससह क्रॉस व्हेरिफिकेशननंतर लाभार्थ्यांची संख्या सुमारे 2.43 कोटींवरून घसरून 1.8 कोटींवर आल्याचा दावा केला जात आहे. तसेच योजनेची सुरुवात केल्यानंतर यात अनियमितता असल्याचे आढळून आल्यानंतर ही पडताळणीची मोहीम हाती घेतल्याचे बोलले जात आहे. या मोहिमेमुळे अनेक लाभार्थी वजा झाले व आता या योजनेत दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी माध्यमांमधून प्रसारित झाली होती. मात्र, हे तथ्यहीन असल्याचे अदिती तटकरे यांनी ट्विट करत स्पष्ट केले आहे.

    तब्बल 1.05 कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले- रोहिणी खडसे

    राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी देखील लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली आहे. रोहिणी खडसे यांनी म्हटले की, आता या क्षणाला मी ही पोस्ट करत असताना विधिमंडळात महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण या विषयावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, संत्री, तज्ज्ञ मंडळी यावर भाषणं ठोकतील आणि दुसरीकडे सरकारने आतापर्यंत तब्बल 1.05 कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले आहे. सरकारचा हा किती दुटप्पीपणा आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

    अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता

    पुढे रोहिणी खडसे यांनी आकडेवारी मांडली आहे. त्यांनी म्हटले, 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा ही योजना सुरू केली होती तेव्हा परिस्थिती काय होती? सुरुवातीचे लाभार्थी 2.53 कोटी, सुरुवातीचे बजेट 45,000 कोटी रुपये. तपासणीनंतर संभाव्य पात्र लाभार्थी 1,48,60,000. 2026-27 बजेटमध्ये तरतूद 26,500 कोटी. संभाव्य अपात्र महिला सुमारे 1.05 कोटी. म्हणजे निवडणूक होती तेव्हा शासनाने सरसकट लाडक्या बहिणींना पैसे दिले. निवडणुका जिंकल्या तर हळूहळू लाडक्या बहिणींवरचे प्रेम कमी होऊ लागले. शासनाची ही वागणूक म्हणजे ‘अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता!’, अशा शब्दांत रोहिणी खडसे यांनी टीका केली आहे.

    No Reduction in Ladki Bahin Beneficiaries: Minister Aditi Tatkare Refutes Claims VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rohit Pawar : पुण्यातील महामार्गाला अजितदादांचे नाव द्यावे; रोहित पवारांची नितीन गडकरींकडे मागणी

    मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी सरकारची; आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगेंचा संताप

    महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 51 लाख कोटींची, युरोप मधल्या काही देशांना आणि पूर्व आशियातल्या देशांनाही टाकले मागे; मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून आकडे बोलले!!