प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठकीत मंत्री शंभूराज देसाई यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना थेट सवाल विचारला मनोज जरांगे पाटलांची सरसकट कुणबी प्रमाणपत्रांची मागणी आहे त्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे का??, हे स्पष्ट करा म्हणजे जनतेलाही खरं काय ते समजेल, असा टोला शंभूराज देसाई यांनी लगावला.Kunbi certificate demand??; Shambhuraj Desai direct question to Pawar – Thackeray!!
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईत सर्वपक्षीय बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे नेते आणि ठाकरे गटाकडून अनिल परब उपस्थित आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना थेट सवाल केला आहे.
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसंच विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेऊन राज्य सरकारने मराठा सरकसट कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा करावी, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना प्रश्न केला आहे. जरांगे पाटील यांच्या मागणीवर तुमची काय भूमिका आहे? असा सवाल शंभूराज देसाई यांनी केला.
जरांगेंच्या मागणीला पाठिंबा आहे का?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षांनी मराठा समाजाला शांततेचं आवाहन केलं पाहिजे. तसंच संपूर्ण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. आता जरांगे पाटील यांच्या या मागणीवर सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांचे जरांगेंच्या मागणीला समर्थन आहे का?? तुमच्या पक्षाला हे मान्य आहे का?? त्यामुळे या सर्व नेत्यांनी आपले मत राज्यातील जनतेसमोर मांडावे. यामुळे कुठल्या पक्षाची नेमकी काय भूमिका आहे??, हे राज्यातील जनतेलाही कळेल, असा टोला मंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईत सह्याद्री अतिथिगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू आहे. दुसरीकडे मंत्रालयाबाहेर मराठा समाजाच्या आमदारांनी आंदोलन सुरू केले आहे. २५ हून अधिक आमदारांनी आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले असून, मंत्रालयाला टाळे ठोकले आहे. एक मराठा, लाख मराठा… अशा घोषणा दिल्या जात आहेत.
Kunbi certificate demand??; Shambhuraj Desai direct question to Pawar – Thackeray!!
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न तरी सत्ताधारी आमदारांचे उपोषण का??; अजितदादांच्या कानपिचक्या!!
- कंत्राटी भरतीचा शासन निर्णय अखेर रद्द; महाविकास आघाडीने नेमलेल्या एजन्सीला महायुतीचा मोठा दणका!
- पीयूष गोयल यांच्या फोनवरही आले नोटिफिकेशन, ‘Apple’ला उत्तर द्यावे लागेल – राजीव चंद्रशेखर
- दहशतवादी हल्ल्यात हेडकॉन्स्टेबल शहीद, घरात घुसून गोळी झाडली; तीन दिवसांत हल्ल्याची तिसरी घटना