• Download App
    Former Maval MLA Krishnarao Bhegade Dies at 89 माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन;

    Krishnarao Bhegade : माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन; वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Krishnarao Bhegade

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : Krishnarao Bhegade मावळ तालुक्याचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे सोमवार 30 जून रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री 9 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात असून, मावळ तालुक्यात शोककळा पसरली आहे.Krishnarao Bhegade

    मंगळवारी (दि. 1 जुलै) रोजी सकाळी अकरा वाजता राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघेल. तर, बनेश्वर स्मशानभूमी, तळेगाव दाभाडे येथे त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात येतील. दरम्यान मावळचे आमदार सुनील शेळके, माजी आमदार बाळा भेगडे अन्य नेतेगण व सर्वच स्तरातून कृष्णराव भेगडे यांच्या निधनावर शोक व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.



    कृष्णराव भेडगे यांचा अल्प परिचय?

    कृष्णराव भेगडे मावळ विधानसभेचे दोन टर्मचे आमदार आहेत. तसेच त्यांनी पाच वेळा विधानसभा लढविली होती. शरद पवार यांचे खंदे समर्थक राहिलेले कृष्णराव भेगडे यांचा प्रवास भारतीय जन संघ ते काँग्रेस ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा राहिलेला आहे.

    अवघ्या 459 मतांनी गेली पहिली आमदारकी

    कृष्णराव भेगडे यांनी 1967 साली पहिल्यांदा भारतीय जनसंघाच्या तिकीटावर मावळमधून निवडणूक लढवली. त्या वेळेस मावळ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. काँग्रेसचे रघुनाथ शंकर सातकर यांच्याशी झालेल्या लढतीत यांना पराभव स्वीकारावा लागला होता. सातकर यांना 19 हजार 525 तर भेगडे यांना 19 हजार 66 मते मिळाली. भेगडे यांची फक्त 459 मतांनी आमदारकी गेली.

    पराभवानंतर जोमाने काम केले आणि इतिहास घडविला

    1967 च्या निवडणुकीतील पराभवानंतर खचून न जाता भेगडे यांनी मतदारसंघात मेहनतीने काम सुरू ठेवले. भारतीय जनसंघाचा विचार सामान्यांपर्यंत नेला आणि 1972 साली पुन्हा विधानसभेच्या मैदानात उतरून काँग्रेसचे रघुनाथ सातकर यांचा 3 हजार 636 मतांनी पराभव केला. या विजयासह त्यांनी मावळमध्ये जनसंघाचा झेंडा फडकावला.

    पहिल्या टर्ममधील प्रभावी कामगिरीमुळे, 1978 च्या निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर मोठा विजय मिळवला. यावेळी त्यांनी नथूभाई भेगडे यांचा तब्बल 9 हजार 333 मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे, मावळ विधानसभेच्या स्थापनेनंतर सलग दोन वेळा निवडून आलेले आणि तेही वेगवेगळ्या पक्षांतून निवडून येणारे एकमेव आमदार होण्याचा मान भेगडे यांना मिळाला.

    पक्ष बदल आणि पराभव

    1978 नंतर काँग्रेसमध्ये फूट पडली आणि जनता पार्टीचे सरकार देखील कोसळले. यावेळी कृष्णराव भेगडे हे इंदिरा गांधी यांच्या विरोधात स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय कांग्रेस (यू) गटात दाखल झाले. सरकार कोसळल्यानंतर 1980 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते INC (I) चे उमेदवार बी. एस. गाडे पाटील यांच्याविरोधात उभे राहिले. त्यावेळी त्यांचा 1 हजार 532 मतांनी पराभव झाला.

    त्यानंतर 1992 आणि 1994 असे दोनदा ते विधान परिषदेवर निवडून गेले होते. शरद पवार हे संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देऊन केंद्रातून पुन्हा राज्यात मुख्यमंत्री झाले. शरद पवार यांच्यासाठी भेगडे यांनी आपल्या विधान परिषदेच्या जागेचा राजीनामा दिला होता. नंतर पुन्हा त्यांना विधानपरिषदेवर 1994 ला घेण्यात आले.

    त्यानंतर पुढील दशकात त्यांनी काँग्रेस सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 1999 मध्ये त्यांनी भाजपच्या दिगंबर बाळोबा भेगडे यांच्या विरोधात निवडणूक लढविली. या निवडणुकीतही त्यांचा तब्बल 16 हजार 245 मतांनी पराभव झाला. या पराभवानंतर मात्र त्यांनी पुन्हा निवडणूक न लढवता पक्ष कार्यात स्वतःला गुंतवून घेतले.

    Former Maval MLA Krishnarao Bhegade Dies at 89

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कटू इतिहास विसरून ठाकरे बंधू एकत्र; पण भाजप मधले जुने शिवसैनिक अस्वस्थ!!

    Gopichand Padalkar : ‘पादरी’चे सैराट करणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस; गोपीचंद पडळकरांचे ख्रिश्चन धर्मगुरूविरोधात वादग्रस्त विधान

    Eknath Shinde : विरोधकांना एक्स्पोज करताना स्वतः एक्स्पोज होऊ नका; एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना कानपिचक्या