गोसावी हे परराज्यात दडून बसल्याची माहिती असल्याने त्याच्या शोधासाठी पोलीस परराज्यात रवाना झाल्या आहेत.KP Gosavi’s location changes frequently; What exactly is the location? Two teams of Pune police will go abroad to search
विशेष प्रतिनिधी
पुणे : क्रुझ ड्रग्ज पार्टीतील पंच केपी गोसावी ऊर्फ किरण गोसावी याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी दोन पथकं तयार केली आहेत. गोसावी याचं लोकेशन वारंवार बदलत असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची ही दोन्ही पथकं परराज्यात रवाना झाल्या आहेत.
केपी गोसावीच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी दोन पथकं तयार केल्या आहेत. गोसावी हा परराज्यात दडून बसल्याची माहिती असल्याने त्याच्या शोधासाठी पोलीस परराज्यात रवाना झाल्या आहेत. गोसावी वारंवार त्याचं लोकेशन बदलत असल्याने त्याचा शोध घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्याचे शेवटचे लोकेशन आगरतळा येथील होते. त्यामुळे पोलीस आगरतळा येथे जाऊन गोसावी याचा शोध घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची 2018 मध्ये फसवणूक केल्याचा आरोप आहे. मलेशियात नोकरी लावण्याच्या आमिषाने किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी चिन्मयची तीन लाखांना फसवणूक केली होती. त्यानंतर 2018 मध्ये दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
याच गुन्ह्यात पुणे पोलिसांनी शेरबानो कुरेशीला मुंबईतून अटक केली. तिला आज कोर्टात हजर केले जाणार आहे. दुसरीकडे, किरण गोसावीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं कार्यरत झाली आहेत. महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांमध्ये किरण गोसावीचा शोध घेतला जात आहे.
नोकरीचं दाखवलं आमिष
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवलेलं आहे. याच किरण गोसावीने अनेक तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालघर तालुक्यातील एडवण या गावातील दोन तरुणांचीही त्याने दोन वर्षांपूर्वी फसवणूक केल्याचा आरोप झाला आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाखाची मागणी गोसावी याने केली होती.
कोण आहे केपी गोसावी ?
व्हायरल झालेले कथित एनसीबी अधिकारी किरण गोसावी हे देशभरात, परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्ज रिक्रूटमेंट कंपनीचे मालक असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे के. पी. जी. ड्रीम्ज कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी यांची ओळख आहे.
गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय नवाब मलिक यांनीही तसा दावा केला आहे. के. पी. गोसावी यांच्याविरोधात 2018 मध्ये पुण्यातील तरुणाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मलेशियात नोकरीचं आमिष दाखवून 3 लाख उकळल्याचा आरोप संबंधित तरुणाने केला होता, अशीही माहिती आता समोर येताना दिसत आहे.
KP Gosavi’s location changes frequently; What exactly is the location? Two teams of Pune police will go abroad to search
महत्त्वाच्या बातम्या
- कोयना परिसरात झालेला भूकंप ३.९ रिश्टर स्केलचा; केंद्रबिंदू धरणापासून २८ किलोमीटरवर
- भारत पाक सामन्यानंतर सुब्रमण्यम स्वामींनी बीसीसीआयवर साधला निशाणा ; म्हणाले – बुद्धू २०२१ चा किताब दिला पाहिजे
- SUPPORT SAMEER WANKHEDE : नवाब मालिकांचे ट्विट ‘समीर दाऊद वानखेडे’ ! वानखेडेंच्या वैयक्तीक आयुष्यावर चिखलफेक ; कथित पहिल्या लग्नाचा जुना फोटो शेअर ;नेटकरी भडकले मंत्री साहेब ट्रोल
- भाजपसाठी धर्मनिरपेक्षतेचा अर्थ काय? केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आकडेवारीसह दिले स्पष्टीकरण