Friday, 9 May 2025
  • Download App
    ‘हरवले आहेत’, दादा परत या; कोथरुडकरांची आमदार चंद्रकात पाटलांची पोस्टरमधून साद|Kothrud MLA chandrakant patil abscond last one month, poster war in Kothrud they matter says 'Dada parat ya'

    ‘हरवले आहेत’, दादा परत या; कोथरुडकरांची आमदार चंद्रकात पाटलांची पोस्टरमधून साद

    कोल्हापूर येथील विधानसभा पोटनिवणुकीकच्या प्रचारात पुण्यातील कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील व्यस्त झाले आहे यावरून पुण्यात पुन्हा पोस्टरबाजी करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांना मतदार संघाकडे लक्ष देण्याची विनंती करण्यात आली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे – पुणे तेथे काय उणे ! एखाद्याला खोचक टोमणा कसा मारावा किंवा एकाद्याचा पाणउतारा कसा करावा हे पुणेकरांना चांगलेच माहिती आहे. सर्वसामान्य व्यक्ती असो का राजकारणी अस्सल पुणेकर कुणालाच त्याच्या वाणीतून सोडत नाही. असाच अनुभव भाजपचे प्रदेशाध्यष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांना आला आहे.Kothrud MLA chandrakant patil abscond last one month, poster war in Kothrud they matter says ‘Dada parat ya’

    गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या मतदार संघाकडे दुर्लष केल्याने येथील काही स्थानिकांनी ‘चंद्रकांत दादा हरवले आहे, जेथे असाल तेथून परत या’ असे पोस्टर लावले आहे. या पोस्टरची चर्चा पुण्यात रंगली आहे.



    कोथरुडमध्ये लावलेले हे बॅनर सध्या सर्वांचे लष वेधून घेत आहेत. ‘कोथरुड मतदार संघातील भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील हे गेल्या महिन्याभरापासून हरवले आहेत. जर कुणाला सापडल्यास कृपया संपर्क साधावा, समस्त कोथरुकडर.’ दादा एक महिना झाला आहे. तुमचा शोध कुठेच लागत नाही, आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. तुम्ही जेथे कुठे असाल तेथून परत या, आम्ही तुमची वाट पाहतोय, असा मजकुर रस्त्यांच्या कडेला असणा-या या पोष्टरवर झळकत आहे.

    Kothrud MLA chandrakant patil abscond last one month, poster war in Kothrud they matter says ‘Dada parat ya’

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची केली “चव्हाण + रेड्डी काँग्रेस”; पुढच्या पिढीला दिले एकत्रीकरणाचे अधिकार!!

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस