• Download App
    कोल्हापूर: चारचाकीला अचानक लागली आग ; आगीत हॉटेल व्यावसायिकाचा होरपळून मृत्यूKolhapur: Four-wheeler suddenly caught fire; Hotelier dies in fire

    कोल्हापूर: चारचाकीला अचानक लागली आग ; आगीत हॉटेल व्यावसायिकाचा होरपळून मृत्यू

    कोल्हापूरहून मलकापूरच्या दिशेने जात असलेल्या चारचाकीला अचानक आग लागली. ही आग सायंकाळी पाचच्या सुमारास लागली.Kolhapur: Four-wheeler suddenly caught fire; Hotelier dies in fire


    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर बोरपाडले घाटात भरधाव कारला अचानक आग लागली. या आगीत कार जळून खाक झाली असून यामध्ये दुर्दैवाने वाहन चालकाचा होरपळून मृत्यू झाला. अभिजित पांडूरंग ठाणेकर (रा. आजरा) असे या चालकाचे नाव आहे. तो एक हॉटेल व्यावसायिक होता.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून मलकापूरच्या दिशेने जात असलेल्या चारचाकीला अचानक आग लागली. ही आग सायंकाळी पाचच्या सुमारास लागली. या आगीत चारचाकी गाडी भस्मसात झाली असून चालकाचा सुद्धा होरपळून मृत्यू झाला.



    शॉर्ट सर्कीटमुळे गाडीत आग लागलेची माहिती मिळाली. स्थानिकांसह कोल्हापूर महानगरपालिका अग्निशामक विभागाने या गाडीला लागलेली आग विझवली.

    घटनास्थळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांनी पाहणी केली आणि घटनेचा पंचनामा केला. तसेच पोलीस पुढील तपास करत आहेत.

    Kolhapur: Four-wheeler suddenly caught fire; Hotelier dies in fire

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सलमान खान गोळीबार प्रकरण: अटक केलेल्या सर्व आरोपींवर मुंबई पोलिसांनी लावले ‘MCOCA’ कलम!

    आप आमदार अमानतुल्ला यांना ईडीचे समन्स; 29 एप्रिलला कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??