• Download App
    Kirit Somaiya - Yashwant Jadhav : यशवंत जाधवांचा 1000 कोटींचा घोटाळा, 36 इमारतींची खरेदी, पण कोणत्या?; किरीट सोमय्यांच्या आरोपातून खुलासा!! । Kirit Somaiya - Yashwant Jadhav: Yashwant Jadhav scam of Rs 1000 crore, purchase of 36 buildings, but which ?; Revealed from Kirit Somaiya's allegations !!

    Kirit Somaiya – Yashwant Jadhav : यशवंत जाधवांचा 1000 कोटींचा घोटाळा, 36 इमारतींची खरेदी, पण कोणत्या?; किरीट सोमय्यांच्या आरोपातून खुलासा!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांचे मोडस ऑपरेंडी कशी होती? त्यांनी मुंबईत दोन वर्षात कोणता “पराक्रम” गाजवला याबाबतचा खुलासा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या कागदपत्रातून झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करून वेगळा दावा केला आहे. Kirit Somaiya – Yashwant Jadhav: Yashwant Jadhav scam of Rs 1000 crore, purchase of 36 buildings, but which ?; Revealed from Kirit Somaiya’s allegations !!

    यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत यांनी मुंबईत 36 इमारती विकत घेतल्या असून एक हजार कोटींचा घोटाळा समोर आला असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

    काही दिवसांपूर्वी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने यशवंत जाधव यांच्या घरावर छापा घातले होते. त्यानंतर जाधव यांनी बेनामी संपत्ती जमवली असल्याची चर्चा सुरू होती. किरीट सोमय्या यांनी आज ट्विट करत जाधव यांच्यावर आरोप केले. शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत यांनी 24 महिन्यात मुंबईत 1000  घर/दुकान/गाळे असलेल्या 36 बिल्डिंग ( जुन्या पघडीचा इमारती) विकत घेतल्या असून 1000 कोटींचा घोटाळा बाहेर आला आहे असल्याचा दावा सोमय्यांनी केला.



    यशवंत जाधव यांच्या या घोटाळ्याचा  ईडी, कंपनी मंत्रालय, आयकर विभागाकडून तपास सुरू असून काही दिवसात कारवाईची अपेक्षा असल्याचे सोमय्या यांनी म्हटले. यशवंत जाधव यांच्याकडे एवढी संपत्ती असेल तर त्यांच्या नेत्यांकडे किती संपत्ती असेल, असा सवालही सोमय्या यांनी उपस्थित केला.

    चार दिवस सुरू होती छापेमारी

    इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने यशवंत जाधव यांच्या घरी चार दिवस छापे घातले होते. या वेळी त्यांनी काही कागदपत्रेही ताब्यात घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉर्पोरेट अफेयर्सने यशवंत जाधव यांच्या 12 हून अधिक शेल कंपन्या उघडकीस आणल्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून मोठे आर्थिक व्यवहार झाले असल्याचेही चौकशीत समोर आले होते. त्याशिवाय कंपनी कायद्यानुसार या कंपन्यांमध्ये काही त्रुटी देखील आढळून आल्या आहेत. त्यामुळे आता यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची दाट शक्यता आहे.

    Kirit Somaiya – Yashwant Jadhav: Yashwant Jadhav scam of Rs 1000 crore, purchase of 36 buildings, but which ?; Revealed from Kirit Somaiya’s allegations !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा