Friday, 9 May 2025
  • Download App
    Kirit Somaiya : नुसते आरोप नकोत, कागद दाखवा!!; संजय राऊतांना किरीट सोमय्यांचे पुण्यातून प्रत्युत्तर!! |Kirit Somaiya: Don't just accuse, show the paper !!; Kirit Somaiya's reply to Sanjay Raut from Pune !!

    Kirit Somaiya : नुसते आरोप नकोत, कागद दाखवा!!; संजय राऊतांना किरीट सोमय्यांचे पुण्यातून प्रत्युत्तर!!

    प्रतिनिधी

    पुणे : वाधवानशी किरीट सोमय्या यांचा संबंध काय?, त्याच्या कंपनीत किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या याची पार्टनरशिप कशी? अशा स्वरूपाचे प्रश्न शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आजच्या मुंबईतल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा उपस्थित केले. त्याचवेळी किरीट सोमय्या हे ईडीचे पाचवे वसुली एजंट आहेत, असा खळबळजनक आरोपही संजय राऊत यांनी केला. या मुद्द्यावर पुण्यातल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे.Kirit Somaiya: Don’t just accuse, show the paper !!; Kirit Somaiya’s reply to Sanjay Raut from Pune !!

    ईडीचे वरिष्ठ अधिकारी असलेले जितेंद्र नवलानी याने १०० हून अधिक बिल्डर आणि डेव्हलपर्सना धमकावू पैसे लुबाडले असल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी जितेंद्र नवलानी कोण आहेत? किरीट सोमय्या यांच्याशी नवलानीचा काय संबंध आहे असे सवाल उपस्थित केले आहेत.



    किरीट सोमय्यांचे प्रत्युत्तर असे :

    संजय राऊत आरोप करत असलेल्या प्रकरणाशी माझा दमडीचा संबंध नाही, त्यांच्याकडे एकही कागदपत्र नाहीए. उलट मी अधिकृत कागदपत्रांशिवाय एकही आरोप केलेला नाही.

    कोविड घोटाळ्यात संजय राऊतचे पार्टनर सुजीत पाटकर यात पूर्णपणे बुडाले आहेत. शिवाजी नगर जम्बो कोविड सेंटरचे काम संजय राऊतांचे पार्टनर सुजीत पाटकरच्या कंपनीला दिले. पण ती कंपनीच अस्तित्वात नाही. त्याला ब्लॅक लिस्टेड केले, अजित पवार खोटं का बोलतात?, त्यांनी कमिटी नेमली होती. त्या कमिटीने रिपोर्ट दिला, पुणे महापालिकेने रिपोर्ट दिला की ही बोगस कंपनी आहे.

    आदित्य ठाकरे यांनी नंतर चार कोविड सेंटरची कामे सुजित पाटकर यांना दिली. या मुद्द्यावर उत्तर देण्याची शिवसेनेची हिंमत नाही, म्हणून आता काहीही आरोप करत आहेत.

    शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांचा हा विषय नाही, तर माफियागिरी करणाऱ्या घोटाळेबाजांचा आहे. जे घोटाळा करतात ते कोविडच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या जीवाशी खेळताहेत.

    मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एसआरएचे गाळे ढापले, याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिक दाखल झाली असून लवकर सुनावणी व्हावी यासाठी मी प्रयत्न करत आहे असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.

    Kirit Somaiya: Don’t just accuse, show the paper !!; Kirit Somaiya’s reply to Sanjay Raut from Pune !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस

    Devendra Fadnavis : महाराष्ट्र शासन अन् विधि सेंटर फॉर लिगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार