• Download App
    700 Fake Birth Certificates Issued in Sambhajinagar: Kirit Somaiya Demands Probe संभाजीनगरात 700 बोगस जन्म प्रमाणपत्रांचे वाटप, किरीट सोमय्यांनी महापौरांकडे केली चौकशीची मागणी

    Kirit Somaiya : संभाजीनगरात 700 बोगस जन्म प्रमाणपत्रांचे वाटप, किरीट सोमय्यांनी महापौरांकडे केली चौकशीची मागणी

    Kirit Somaiya

    विशेष प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : Kirit Somaiya छत्रपती संभाजीनगर महापालिकेतून ७०० बोगस जन्म प्रमाणपत्रे वाटली गेल्याचा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमवारी त्यांनी महापौर समीर राजूरकर यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.Kirit Somaiya

    मागील दोन वर्षांत तब्बल १६ हजार संशयित प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सोमय्या यांनी या वेळी जिल्ह्यातील ‘मोहळा’’’’ गावाचे उदाहरण दिले. या गावाची एकूण लोकसंख्या कमी असताना तिथल्या नावावर वाटलेली प्रमाणपत्रे मात्र अधिक आहेत.Kirit Somaiya



    मनपाच्या जुन्या रेकॉर्डमध्ये १६,००० संशयास्पद नावे वाढवण्यात आल्याची बाब त्यांनी समोर आणली. या घोटाळ्यात आतापर्यंत १०,००० लोकांना आरोपी बनवण्यात आले आहे.

    “छत्रपती संभाजीनगर शहरात कारवाई सुरू झाली असली तरी सिल्लोडमध्ये अद्याप कोणतीही ठोस कारवाई का झाली नाही?’ असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. हे बोगस प्रमाणपत्र तत्काळ रद्द करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

    700 Fake Birth Certificates Issued in Sambhajinagar: Kirit Somaiya Demands Probe

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Navnath Ban : ‘पार्थ पवारांवर बोलण्यापूर्वी ४० आमदार का गेले ते पाहा’; नवनाथ बन यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

    Prajakt Tanpure : प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशाने शरद पवार गटाला धक्का; सुप्रिया सुळे म्हणाल्या- शुभेच्छा, जयंत पाटील म्हणाले- धक्कादायक निर्णय

    Laxman Hake : ‘जरांगे बाजेवर बसले तर आम्ही ढेकळात बसू’; लक्ष्मण हाकेंचा इशारा, मराठा-ओबीसी वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे