• Download App
    किरीट सोमय्यांचा बाण आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर; घोटाळ्यांचे 2700 पानी पुरावे दिले आयकर विभागाकडे|Kirit Somaiya Allegations On Maharashtra Minister Hasan Mushrif Money Laundering

    किरीट सोमय्यांचा बाण आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर; घोटाळ्यांचे २७०० पानी पुरावे दिले आयकर विभागाकडे

    प्रतिनिधी

    मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले आहेत. त्यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे आज दुपारी १.०० च्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन ठाकरे – पवार सरकारचे मंत्री हसन मुश्रीफ यांना घेरले. त्यांनी शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.Kirit Somaiya Allegations On Maharashtra Minister Hasan Mushrif Money Laundering

    अनिल परब, अनिल देशमुख अशा मंत्र्यांनंतर आता किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वळवला आहे. मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्यांचे तब्बल २७०० पानी पुरावेच आपण आयकर विभागाकडे सादर केल्याचे किरीट सोमय्या यांनी जाहीर केले. तसेच, फक्त हसन मुश्रीफच नाही, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या नावे हे पुरावे असल्याचे ते म्हणाले.

    २७०० पानी पुरावे…!

    ते म्हणाले की “मी ठाकरे – पवार सरकारमधील ११ भ्रष्टाचारी मंत्र्यांची यादी जाहीर केली होती. पण दुर्दैवाने ११ जणांच्या टीममध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढायला लागली आहे. हसन मुश्रीफ यांचे नाव राखीव खेळाडूंमध्ये आम्ही वाढवत आहोत.

    हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणार आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती केल्याचे माझ्याकडे २७०० पानांचे पुरावे आहेत. ते मी आयकर विभागाला सोपवले आहेत.

    CRM Systems PVT LTD इथे प्रविण अगरवाल ऑपरेट करतात. या कंपनीतून हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी दोन कोटींचे लोन घेतल्याचे दाखवलेय. या कंपनीवर २०१७-१८मध्ये प्रतिबंध आला होता. त्या कंपनीतून ज्यांनी एंट्री घेतली, त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे.

    त्याच कंपनीतून नाविद मुश्रीफ यांनीही निवडणुकीसाठी फॉर्म भरला होता. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलंय की सीआरएम कंपनीत २ कोटी ४५ लाख ३५४ एवढी रक्कम दाखवली आहे. सीआरएम ही शेल कंपनी असल्याचं सिद्ध झालं आहे”, असा दावा सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

    Kirit Somaiya Allegations On Maharashtra Minister Hasan Mushrif Money Laundering

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस