प्रतिनिधी
मुंबई : ईडी अधिका-यांसाठी खंडणी वसूल करत असल्याचा आरोप असलेले जितेंद्र नवलानी यांची एसआयटी चौकशी बंद करण्यात आली आहे. राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती दिली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यावसायिक जितेंद्र नवलानी यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले होते. चौकशी बंद करून मुंबई पोलिसांनी संजय राऊत यांना दणका दिला आहे, तर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना दिलासा दिला आहे.Kill the Rauts, comfort the Somayas; SIT inquiry into Jitendra Navlani closed by Mumbai Police
मुंबईतील व्यावसायिक जितेंद्र नवलानी हे ईडी अधिका-यांच्या नावाचा वापर करुन बिल्डर्सकडून वसुली रैकेट चालवत असल्याचा संजय राऊत यांनी आरोप केला होता. वर्ष 2015 ते 2021 दरम्यान नवलानी यांनी ईडी अधिका-यांच्या नावाचा वापर करत जवळपास 58.96 कोटी खंडणी म्हणून वसूल केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. जितेंद्र नवलानी हे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
चौकशी बंद केल्याची दिली माहिती
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याकरता, मुंबई पोलिसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. या प्रकरणात अॅंटी करप्शन ब्युरोने मे महिन्यात गुन्हा दाखल केला होता. बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती नितीन जमादार आणि न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी सरकारी वकील अॅड. अरुणा पै यांनी एसआयटी चौकशी बंद केल्याची माहिती दिली.
Kill the Rauts, comfort the Somayas; SIT inquiry into Jitendra Navlani closed by Mumbai Police
महत्वाच्या बातम्या
- आनंदवारी : पंढरपूरला आषाढीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी प्रवास टोल फ्री!!
- राज्यघटने विरोधात गरळ ओकणे केरळच्या कम्युनिस्ट मंत्र्याला पडले महागात; साजी चेरियनांचा राजीनामा!!
- शिवसेना : खासदारांच्या बंडाळी पूर्वी ठाकरे गटाची कारवाई; भावना गवळींना हटवून राजन विचारेंकडे प्रतोदपद!!
- येवल्यातल्या अफगाणी सुफीबाबाची नाशिक जिल्ह्यात 1.5 वर्षात करोडोंची संपत्ती; हत्येचे गूढ वाढले, दोघेजण ताब्यात!!