कर्नाटक येथून पुण्यात येऊन बनावट चाविचा वापर करून वाहने चोरून करून नेणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले
प्रतिनिधी
पुणे – कर्नाटक येथील चोरट्यांकडून गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी पथक 1 ने पुण्यातून चोरी झालेली अकरा वाहने जप्त केली. यावेळी पथकाने दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून पाच, दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन तर विश्रामबाग आणि वानवडी येथील एका वाहनाचा समावेश आहे. दोन दुचाकींच्या मालकांची माहिती पोलिस घेत आहे.Karnatak Vehical theft accused arrested in Pune
गणेश हुच्चप्पा गुडळी (रा. गुडळी, कर्नाटक) आणि लोहित राहुल काळे (रा. बंखलकी, कर्नाटक ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये वारंवार होणाऱ्या चोरींच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी, वाहनचोरांचा शोध दरोडा व वाहनचोरी पथक 1 कडून सुरू होता.
दरम्यान गुन्ह्यातील कर्नाटक येथील आरोपी गणेश गुंडळी हा हिंगणे येथे वाहन चोरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शुभांगी नरके, अमंलदार श्रीकांत दगडे, निलेश शिवतरे, सुमित ताकपेरे, मॅगी जाधव यांनी गुडळी आणि काळे या दोघांना ताब्या घेतले असता
त्यांच्याकडून अकरा दुचाकी जप्त करण्यात आल्या. दोघांना पुढील कार्यवाहीसाठी सिंहगडरोड पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.कोट दोघेजण कर्नाटकातील अट्टल वाहन चोर आहेत. दोघेही एका दुचाकीवर फिरून शहराज दुचाकी चोरायचे त्या दुचाक्या कर्नाटक येथे नेऊन विकण्याचे. त्
यांच्याकडून सिंहगड रोड परिसरातून चोरलेली एक दुचाकी सुरूवातीला जप्त करण्यात आली. नंतर कर्नाटक येथून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. तर काही दुचाकी त्यांनी पेट्रोल संपल्यानंतर सोडून दिल्या होत्या त्या दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत.
Karnatak Vehical theft accused arrested in Pune
महत्त्वाच्या बातम्या
- आसाम मध्ये 80 महापालिका – नगरपालिका निवडणुकीत भाजपचा प्रचंड विजय; भाजप 759 काँग्रेस 79 इतर 141
- अर्थसंकल्प सादर करण्यासाठी शेणापासून बनवलेले ब्रीफकेस आणले
- खून प्रकरणात पश्चिम बंगालच्या एकास जन्मठेपेची शिक्षा
- बेकर इंडिया महाराष्ट्रात करणार दहा काेटींची गुंतवणुक