वृत्तसंस्था
मुंबई : पदेशात बसून भारतातल्या प्रत्येक गोष्टीवर वाटेल तशी वादग्रस्त टीका टिप्पणी करणारी ट्विट करणारा अभिनेता कमाल आर खान अखेर कायद्याच्या कचाट्यात आला आहे.Kamal R Khan gets in trouble with the law; Arrested as soon as he entered Mumbai from abroad!!
परदेशातून मुंबईत दाखल होताच पोलिसांनी विमानतळावरच त्याला अटक केली आहे. धर्म, भाषा, बॉलिवूड सेलिब्रिटी, सिनेमा अशा वाटेल त्या विषयांवर वाटेल तशी ट्विट करणे हा कमाल आर खानचा धंदा झाला होता. गेली दोन वर्षे तो सिनेमात काम करण्यापेक्षा ट्विट करण्याच्या उद्योगातच रमला होता. त्यातही परदेशात राहून त्याचे हे ट्विट उद्योग सुरू असल्याने भारतात त्याच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई करता येत नव्हती.
परंतु, आज कमाल खान मुंबई विमानतळावर दाखल होताच पोलिसांनी त्याला 2020 च्या वादग्रस्त ट्विटच्या मुद्द्यावरून अटक केली आहे. आज त्याला बोरिवली कोर्टात पेश केले जाईल. धर्म, भाषा, बॉलीवूड सेलिब्रिटी, सिनेमा, क्रिकेट आदी विषयांवर त्याची बहुतांश ट्विट वादग्रस्त ठरली आहेत. अनेक ट्विट्स तर पर्सनल अटॅक करणारी ठरली आहेत. सलमान खानने आधीच त्याच्यावर बदनामीचा खटला दाखल केला आहे.
पञ काही माध्यमांनी कमाल हार खान कसा परखड ट्विट करतो असे वर्णन करून त्याच्या बातम्या दिल्या होत्या. परंतु आता त्याच्या प्रत्येक ट्विटला कायद्याच्या कसोटीवर तपासले जाऊन ते परखड आहे की वादग्रस्त?, हे लवकरच ठरणार आहे. आता कायद्याच्या कसोटीवर उतरून कमाल आर कारखाना पुढची वाटचाल करावी लागणार आहे
Kamal R Khan gets in trouble with the law; Arrested as soon as he entered Mumbai from abroad!!
महत्वाच्या बातम्या
- मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांची कामे युद्ध पातळीवर करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
- सोनिया गांधींच्या PAवर बलात्काराचा आरोप : पीडिता म्हणाली- केस मागे घेण्यासाठी धमक्या मिळाल्या; तपास अधिकारीही बदलले
- विधिमंडळाच्या समोर पेटवून घेणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू, जमीन हडपल्याच्या वादातून केले होते आत्मदहन
- अलाहाबाद हायकोर्टाचे आदेश : मथुरेतील वादग्रस्त जागेच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाचा मुद्दा 4 महिन्यात निकाली काढा!!