प्रतिनिधी
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कळवा पूलाचे उद्घाटन रविवारी झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच मंचावर पहायला मिळाले. नुकत्याच झालेल्या अटकेच्या कारवाईनंतर जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली होती. Kalwa bridge was not completed with the money of Awhad says eknath shinde
त्यानंतर होत असलेल्या कार्यक्रमात दोघांमध्ये खडाजंगी पहायला मिळणार अशा चर्चा सुरू होत्या. त्याप्रमाणे यावेळी शिंदे आणि आव्हाड यांच्यात श्रेयवादाची लढाई रंगली.
पैसा महापालिकेचा, आव्हाडांचा नाही
या पुलासाठी आपण पाठपुरावा केला असून, राज्य सरकार याचं श्रेय आता घेऊ पाहत आहे, अशी टीका यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राज्याचे मुख्यमंत्री या पुलाचे उद्घाटन करणार आहेत. तसेच या पुलाचा सर्व खर्च ठाणे महापालिकेने केला आहे, हा प्रकल्प आव्हाडांच्या वैयक्तिक खर्चातून झालेला नाही. आमदार, खासदार, महापौर कायमच प्रकल्पांसाठी प्रयत्न करत असतात. पण प्रकल्प पूर्ण करायची दानत लागते ती आमच्याकडे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर दिले आहे.
आव्हाडांची टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या कळवा पुलासाठी आपण गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत. त्यामुळे याचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. पण आता उद्घाटनाला येणारे बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना होत आहेत, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर टीका केली होती.
Kalwa bridge was not completed with the money of Awhad says eknath shinde
महत्वाच्या बातम्या