वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात पावसाची मुसळधार बॅटींग सुरु आहे. दुसरीकडे ‘जोवाड’ नावाचं चक्रिवादळ घोंगवत आहे, असा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे अस्मानी संकटांचा सामना करण्यासाठी जनतेला आता तयार रहावे लागणार आहे. ‘Jowad’ cyclone hovering over the state; Due to untimely loss of crops
ऐन थंडीत महाराष्ट्रातील पुण्यासह अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आधी थंडी त्यात पाऊस,अशी परिस्थिती आहे. आता ‘जोवाड’ चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. वादळ आणि हवामानातील बदलांमुळे राज्यातील अनेक भागांत पुन्हा मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वाढली आहे.
आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या समुद्र किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. ३ डिसेंबरपर्यंत त्याचे रुपांतर चक्रीवादळात होईल आणि ते उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकेल, असाही अंदाज आहे.
‘Jowad’ cyclone hovering over the state; Due to untimely loss of crops
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेसच्या शिडातून हवा काढून इतर विरोधकांच्या शिडात पुरती हवा भरली जाईल…??
- ममता आल्या, यूपीएला सुरुंग लावून गेल्या; तरी प्रदेश काँग्रेस नेत्यांनी सुटकेचा नि : श्वास का सोडला??
- महात्मा जोतिबा फुले आणि अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताब द्यावा ; रामदास आठवले
- स्वप्नील जोशी, पूजा सावंत ह्यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या बळी चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित