प्रतिनिधी
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाला बसवरील वाहकांची संख्या कमी पडू लागली आहे. त्यामुळे 2000 कंडक्टरची (वाहक) भरती बदली हंगामी रोजंदारी पद्धतीने केली जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.Job Opportunity : Soon 2000 Carrier Recruitment in PMP in Pune, Pimpri Chinchwad
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात 1650 बसच्या माध्यमातून प्रवाशांना पीएमपीकडून सेवा दिली जाते. सध्या पीएमपीकडे 4100 वाहक आहेत. तरीही पीएमपीला वाहकांची आवश्यकता असून यामुळेच पीएमपीकडून आता आगामी काळात दोन हजार वाहकांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी पीएमपीने निविदा प्रक्रियेची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे शहरातील दोन हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे.
वाहक भरती प्रक्रियेसंदर्भात पीएमपीने निविदा प्रक्रिया सुरू केली असून नागरिकांना याची अधिकृत माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी भरतीसंदर्भात कोणत्याही एजंट अथवा तुमचे काम करून देतो असे सांगणाऱ्या व्यक्तीला भेटू नये, आर्थिक देवाण घेवाण करू नये असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे. वाहकांची कमतरता असल्यामुळे आम्ही नव्या ६०० चालकांना वाहक बनवले आहे, तसेच 2000 वाहकांची भरती सुद्धा करण्यात येणार आहे असे वाहतूक व्यवस्थापकांनी स्पष्ट केले आहे.
Job Opportunity : Soon 2000 Carrier Recruitment in PMP in Pune, Pimpri Chinchwad
महत्वाच्या बातम्या
- मोहित कंबोज यांनी ट्विट केलेला राष्ट्रवादीचा बडा नेता कोण??; पवार की पटेल??
- बिलकिस बानो सामूहिक बलात्कार प्रकरण : गुजरात सरकारच्या माफी धोरणानुसार 11 दोषींची सुटका
- हेमेंद्र महेता शिवसेनेतून भाजपामध्ये परतले, विनोद तावडे यांचा घराणेशाहीवरून विरोधकांवर हल्लाबोल
- ITBP जवानांची बस दरीत कोसळून 7 ठार, 41 जण होते स्वार; अमरनाथ यात्रेच्या ड्यूटीवरून परतताना दुर्घटना