• Download App
    Job : बार्टीमध्ये शासकीय सेवेअंतर्गत प्रतिनियुक्तीने पदभरती, दहा पदांसाठी मागवण्यात आले अर्ज । Job Opportunity in Barti Pune For Elegible candidates Apply Now

    Job In Barti : बार्टीमध्ये शासकीय सेवेअंतर्गत प्रतिनियुक्तीने पदभरती, दहा पदांसाठी मागवण्यात आले अर्ज

    Job In Barti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे मध्ये विभागप्रमुख (योजना-1 विस्तार सेवा-1) – दोन पदे, निबंधक एक पद, कार्यालय अधीक्षक सात पदे अशी एकूण दहा पद भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही पदे राज्य व केंद्र शासनाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यामधून प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. Job Opportunity in Barti Pune For Eligible candidates Apply Now


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे मध्ये विभागप्रमुख (योजना-1 विस्तार सेवा-1) – दोन पदे, निबंधक एक पद, कार्यालय अधीक्षक सात पदे अशी एकूण दहा पद भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही पदे राज्य व केंद्र शासनाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यामधून प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

    विभागप्रमुख (योजना-1 विस्तार सेवा-1) दोन पदे, निबंधक एक पद, कार्यालय अधीक्षक सात पदे अशी एकूण दहा पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदांची अर्हता, पात्रता, वेतनस्तर, पदाचे कर्तव्य व जबाबदाऱ्‍या या संदर्भात अधिक माहितीकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे यांचे संकेतस्थळ https://barti.maharashtra.gov.in>NoticeBoard ला भेट द्यावी या पदांसाठी अर्ज महासंचालक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे, 28 क्वीन्स गार्डन, जुन्या सर्किट हाऊसजवळ, पुणे 411 001. या पत्त्यावर 31 जुलै 2021 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.

    Job Opportunity in Barti Pune For Eligible candidates Apply Now

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’