• Download App
    अजित पवार गटाने अचानक शरद पवारांची भेट घेतल्यावर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... Jayant Patils first reaction after Ajit Pawar group suddenly met Sharad Pawar

    अजित पवार गटाने अचानक शरद पवारांची भेट घेतल्यावर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

    ‘’मला सुप्रिया सुळेंचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की…’’ असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :  राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे.  मात्र त्यापूर्वी आज पुन्हा एकदा राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. कारण, अवघ्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षातून बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या मंत्र्यांशी यशवंतराव चव्हाण  सेंटरला जाऊन अचानकपणे शरद पवारांची भेट घेतली. यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. Jayant Patils first reaction after Ajit Pawar group suddenly met Sharad Pawar

    या  भेटीनंतर अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, आम्ही शरद पवारांचे  आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. राष्ट्रवादी पक्ष एकसंध राहण्यासाठी मार्ग काढावा, अशी त्यांना विनंती केली आहे. शरद पवारंनी आमच्या बोलण्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. असे सांगितले.

    दरम्यान अजित पवारांचा गट यशवंतराव चव्हाण सेंटरवर आल्यानंतर शरद पवारांनी तातडीने सुप्रिया सुळेंना जयंत पाटील यांना बोलावून घेण्यास सांगितले होते. त्यानुसार विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीत असलेले जयंत पाटील थेट यशवंतराव चव्हाण सेंटरला आले. त्यांनी शरद पवारांची भेट घेतली, त्यानंतर बाहेर येऊन प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

    जयंत पाटील म्हणाले, ‘’विधीमंडळात विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी करण्यासंदर्भात बैठक सुरू होती. त्यावेळी मला अचानक  सुप्रिया सुळेंचा फोन आला आणि शरद पवारांनी तातडीने बोलावलं असल्याचं सांगण्यात आल्याने मी इथे आलो. या ठिकाणी नुकतेच राष्ट्रवादीमधून सत्तारूढ पक्षाच्या बाजूला जाऊन, शपथ घेतलेले सर्व मंत्री आणि विधानपरिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, प्रफुल्ल पटेल हे सर्व उपस्थित होते. त्यांनी झालेल्या घटनेबद्दल शरद पवारांसमोर दिलगीरी व्यक्त केली आणि यातून काहीतरी मार्ग तुम्ही काढा, अशी विनंती त्यांनी केली. मात्र त्यावर शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.’’

    याशिवाय ‘’त्यांनी येऊन शरद पवारांची भेट घेणं ही अनपेक्षित घटना आहे. यावर आम्ही यापूर्वी कधीच विचार केलेला नव्हता. त्यामुळे यावर आता भाष्य करणं मला संयुक्तिक वाटत नाही. ज्यावेळी आम्ही शरद पवारांसोबत एकत्र बसू, त्यावेळी काही चर्चा होतील.’’ असंही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

    Jayant Patils first reaction after Ajit Pawar group suddenly met Sharad Pawar

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!