• Download App
    Jayant Patil जयंत पाटलांना ४० वर्षांत ईश्वरपूरचा रस्ता नाही बांधता आला, आणि आता चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला!!

    जयंत पाटलांना ४० वर्षांत ईश्वरपूरचा रस्ता नाही बांधता आला, आणि आता चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला!!

    – गोपीचंद पडळकर यांचे जोरदार शरसंधान

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वरील “मिसिंग लिंक” प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्याच्या दुर्घटनेवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर पलटवार केला. जयंत पाटलांना चाळीस वर्षात ईश्वरपूरचा रस्ता बांधता आला नाही. आणि आता ते चाललेत “मिसिंग लिंकचा” मुका घ्यायला, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना हाणला.

    राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, पायाभूत सुविधांची गुणवत्ता आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जयंत पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली. अल्पकालीन चर्चेत सहभागी होताना पाटील यांनी सरकारच्या विकास मॉडेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हजारो कोटींचा खर्च करून उभारण्यात येत असलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. हा प्रकल्प राबविताना हवामान बदलाचा आणि भौगोलिक जोखमींचा पुरेसा अभ्यास झाला होता का? तसेच या प्रकल्पाचे ‘क्लायमेट ऑडिट’ का करण्यात आले नाही? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.



    – गोपीचंद पडळकरांचे सडेतोड उत्तर 

    जयंत पाटलांच्या या टीकेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. गोपीचंद पडळकर म्हणाले की, “ज्याला सांगली ईश्वरपूरचा रस्ता 40 वर्षात करायचं जमलं नाही, तो चाललाय कनेक्टिंग लिंकचा मुका घ्यायला. बारामती ते फलटण बरेच वर्ष रस्ता नव्हता. देवाभाऊ मुख्यमंत्री झाले आणि तो हाय वे तयार झाला. यांना गावातलं कळेना आणि हे निघाले कनेक्टिंग लिंकवर बोलायला,” अशी टीका त्यांनी जयंत पाटील यांच्यावर केली.

    गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की, “1853 ला इंग्रजांनी मुंबई – पुणे रस्ता तयार करण्यासाठी एक समिती नेमली. त्यावेळी गोरे लोक रस्ता शोधत होते, त्यावेळी तिथं एक मेंढपाळ होता, त्याने विचारणा केली नेमके हे काय करत आहेत? त्याने पुण्याला जायचा रस्ता सांगितला. त्यावेळी इंग्रज अधिकारी खुश झाला. अधिकाऱ्यानं विचारलं तुम्हाला काय पाहिजे आहे?? त्याने तुम्ही भारतातून निघून जा असं सांगितलं. त्या इंग्रजाने त्या मेंढपाळाला गोळ्या घातल्या. त्या धनगराचं नाव वीर शिंग्रोबा धनगर होतं. म्हणून माझी मागणी आहे त्या कनेक्टिंग लिंकला वीर शिंग्रोबा धनगर नाव द्या, अशी मागणी त्यांनी केली.

    Jayant Patil has not been able to build the road to Islampur in 40 years.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सशक्त लोकशाहीतला संवाद की सगळ्या डगरींवर हात पाय??

    Bawankule : प्रत्येक घटनेला राजकीय रंग देऊ नका; बावनकुळे म्हणाले- पेड वर्कर्सकडून फडणवीसांची बदनामी, मिसिंग लिंक वादावर मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे समर्थन

    CM Shinde : ज्यांच्या पोटात दुखतंय, त्यांनी ‘आपला दवाखान्या’त जावं; शरद पवारांच्या भेटीवरून राऊतांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचा प्रत्युत्तर