विशेष प्रतिनिधी
मुंबई : Jayant Patil राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबद्दल ठाकरेंशी काहीही चर्चा झाली नाही. पण आता हा विलीनीकरणाचा विषयच नाही, कारण ज्यांच्याशी चर्चा केली ते आज दुर्दैवाने आपल्यात नाहीत त्यामुळे आता तो प्रश्नच नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे गटाकडून आमच्या कुठल्या नावाला विरोध झाला असे काही नाही. प्रत्येक पक्षाला आपल्या विद्यमान उमेदवारासाठी जागा मिळावी असे वाटत असते.Jayant Patil
जयंत पाटील म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा अजित पवार यांच्या निधनामुळे पूर्णपणे थांबलेली आहे. आता ही चर्चा पुढे जाणे शक्य नाही आणि आम्ही कुणासोबत चर्चाही करत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूच्या भावना काय आहे हे समजून घेणाराच आता नसल्याने विलीनीकरणाची पूर्णपणे थांबली असून यापुढे ही शक्यता नाही. विलीनीकरणाची चर्चा अजित पवार यांच्या आग्रहाने सुरू झाली होती ती पूर्ण होऊ शकली नाही. आता हा प्रश्न बाजूला गेलेला आहे. आमच्यावर दोन्हीही पक्षाला शंका असण्याचे कारण नाही.Jayant Patil
आम्ही ठाकरेंना आमची इच्छा सांगितली
जयंत पाटील म्हणाले की, काल मी आणि सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शरद पवार यांनी दिल्लीत असणे गरजेचे आहे, त्यासाठी त्यांची राज्यसभेसाठी निवड करण्यात यावी अशी आमची इच्छा आहे ती उद्धव ठाकरेंच्या कानावर घातली. आमच्या पक्षाने आणि काँग्रेसने एकत्र बसत काल किंवा आज निर्णय घेऊ असा उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितले. मिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करणार आहोत.
राज्यसभेसंदर्भात निर्णय झालेला नाही
जयंत पाटील म्हणाले की, आदित्य ठाकरे यांचे बरोबर आहे अजून राज्यसभेसंदर्भात काहीही निर्णय झालेला नाही. निर्णय झाला असे आम्हीही सांगितले नाही. मविआतील सर्व पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. मविआ आणि राष्ट्रवादीसाठी शरद पवार दिल्लीत असणे गरजेचे आहे. शरद पवारांनी राज्यसभेवर जावे यासाठी आम्ही आज सुद्धा चर्चा करणार आहोत. आता फक्त राज्यसभेची चर्चा सुरू आहे. मविआ एकत्रित असेल तर विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत काहीही अडचण येणार नाही.
पायलटचे कॉल रेकॉर्ड तपासावे
जयंत पाटील म्हणाले की, अजित पवार यांच्या अपघाताबद्दल सरकारने पारदर्शक चौकशी केली पाहिजे. तांत्रिक चौकशीमध्ये सर्व काही समोर आले पाहिजे. पायलट बदलला का? त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासणे, जो पायलट आला त्यांच्याशी कोणाचे बोलणं झाले या सर्व गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे. सरकारने जनतेच्या मनातील शंका दूर केली पाहिजे.
NCP Merger Over After Ajit Pawar’s Death, Says Jayant Patil VIDEOS
महत्वाच्या बातम्या
- Muslim Ummah : द फोकस एक्सप्लेनर : इराण-अमेरिका युद्ध, कुठे गेला मुस्लिम ब्रदरहूड? ‘मुस्लिम उम्माह’चे काय?
- महिला आणि अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनेत वाढ, विधान परिषदेत चिंता व्यक्त
- Qatar : द फोकस एक्सप्लेनर : युद्ध इराणमध्ये सुरू, कतारने भारताचा गॅस पुरवठा का कमी केला? वाचा सविस्तर
- शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला ताटकाळत ठेवत अर्ज भरायच्या अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीची राज्यसभा उमेदवारी!!