• Download App
    जयंत पाटलांपाठोपाठ एलन मस्क यांना बंगालच्या मदरसा शिक्षणमंत्र्यांचे गुंतवणुकीसाठी निमंत्रण!! Jayant Patel followed by Alan Musk invited to invest in Bengal Madrasa Education Minister

    जयंत पाटलांपाठोपाठ एलन मस्क यांना बंगालच्या मदरसा शिक्षणमंत्र्यांचे गुंतवणुकीसाठी निमंत्रण!!

    प्रतिनिधी

    मुंबई /कोलकता : इलेक्ट्रिक कार मॅन्युफॅक्चरिंग जाएंट टेस्लाचे मालक एलन मस्क यांना महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीचे आवाहन केले आहे. Jayant Patel followed by Alan Musk invited to invest in Bengal Madrasa Education Minister

    एलन मस्क यांनी महाराष्ट्रात इलेक्ट्रिक कार मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करावे. त्यांना सर्व प्रकारची पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन जयंत पाटील यांनी आपल्या ट्विट मधून दिले आहे. या आधी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी देखील एलन मस्क यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर जयंत पाटलांनी एलन मस्क ट्विटरवरून प्रतिसाद देत महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

    महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांच्या या आवाहनानंतर पश्चिम बंगालमधून एलन मस्क यांना ऑफर आली आहे. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री आणि मदरसा शिक्षण मंत्री मोहम्मद गुलाम रब्बानी यांनी समस्यांना पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे उद्योगस्नेही धोरण आहे. त्यांना विकासाची दूरदृष्टी आहे. त्यामुळे एलन मस्क यांनी पश्चिम बंगालमध्ये आवर्जून गुंतवणूक करावी, असे आवाहन मोहम्मद गुलाम रब्बानी यांनी केले आहे. महाराष्ट्र आणि बंगाल मधून दोन ऑफर आल्यानंतर एलन मस्क हे आता नेमका कोणाच्या आवाहनाला प्रतिसाद देतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.

    Jayant Patel followed by Alan Musk invited to invest in Bengal Madrasa Education Minister

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा