• Download App
    निमित्त जरांगे पाटलांचे; काँग्रेस - भाजपचे राजकारण ओबीसी मजबुतीकरणाचे!!; पवारांच्या मराठा राजकारणाला परस्पर काटशह देण्याचे!!|Jarange Patal's; Congress-BJP politics of OBC strengthening

    निमित्त जरांगे पाटलांचे; काँग्रेस – भाजपचे राजकारण ओबीसी मजबुतीकरणाचे!!; पवारांच्या मराठा राजकारणाला परस्पर काटशह देण्याचे!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांनी ओबीसी मधून मराठा आरक्षणासाठी अतिविशाल सहभाग घेतली असली, तरी त्यामागचे शरद पवारांचे मराठा राजकारण लपून राहिले नाही. आता जरांगे पाटलांच्या या सभेच्या सभेचेच निमित्त करून काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपले राजकारण ओबीसी मजबुतीकरणाच्या दिशेने न्यायचे ठरविले आहे. जरांगे पाटील यांनी घेतलेल्या सभेपेक्षा भव्य सभा घेण्याचा निर्धार ओबीसी समाजातल्या संघटनांनी केलाच आहे. त्यानिमित्ताने काँग्रेसही आपले ओबीसी राजकारण साधून घेऊ पाहत आहे म्हणूनच विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी 40 ओबीसी संघटनांची बैठक बोलावली आहे.Jarange Patil’s; Congress-BJP politics of OBC strengthening

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी जागर यात्रा सुरू आहेच या यात्रेचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ओबीसी महाकुंभ भरवून करण्याचे भाजपमध्ये घाटत आहे. जरांगे पाटलांच्या निमित्ताने शरद पवारांच्या मराठा राजकारणाला ओबीसी महाराजकारण करून परस्पर काटशह देण्याचा काँग्रेस आणि भाजपचा इरादा आहे.



    जरांगे पाटलांच्या मागणीनुसार ओबीसींमध्ये मराठ्यांना आरक्षण दिले तर ओबीसींचे आरक्षण कमी होण्याची भीती ओबीसींना वाटते आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी जरांगे पाटील यांची मागणी फेटाळून लावली आहे. काही नेत्यांनी तर आम्ही जरांगे पाटील यांच्यापेक्षा पाचपट सभा घेऊन मराठ्यांच्या ओबीसीतील समावेशाला विरोध करू असा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि भाजपचे ओबीसी सेलही कामाला लागले आहेत. या दोन्ही सेलची आज बैठक होणार आहे.

    मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ओबीसी नेते अस्वस्थ झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी ही ओबीसी संघटनांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला ओबीसींच्या 40 संघटना उपस्थित राहणार आहेत. नागपूरात रवी भवन येथे आज सकाळी 11.30 वाजता ही बैठक होणार आहे.

    भव्य मोर्चा काढणार

    या बैठकीत ओबीसी आंदोलनाची पुढील रुपरेषा ठरवण्यात येणार आहे. बैठकीत राज्यभरातील प्रमुख ओबीसी संघटनांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. ओबीसींचा भव्य मोर्चा काढण्यावरही बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या बैठकीतील निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    काँग्रेसचीही बैठक

    दरम्यान, काँग्रेसच्या प्रदेश सेलने ओबीसींची तातडीची बैठक बोलावली आहे. तडकाफडकी ही बैठक बोलावली आहे. मुंबईत ही बैठक होत आहे. जरांगे पाटील यांच्या अल्टिमेटला फक्त आठ दिवस उरले आहेत. त्यामुळे सरकारवर दबाव आणण्यासाठी या बैठकांचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

    मोदींच्या उपस्थित ओबीसी महाकुंभ

    भाजपच्या ओबीसी सेलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ओबीसींचा महाकुंभ घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. डिसेंबर महिन्यात लोकसभा निवडणुक लागण्यापूर्वी पंतप्रधानांच्या उपस्थितीत ओबीसी महाकुंभ म्हणून मोठी सभा घेण्याचं भाजपचं नियोजन आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात राज्यात ओबीसी जागर यात्रा सुरू आहे. या यात्रेचा समारोप ओबीसी महाकुंभ घेऊन करण्याचं भाजपमध्ये घटत आहे. त्यासाठी आज भाजपच्या ओबीसी सेलने मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

    भाजपची बैठक

    आज सकाळी 11.30 वाजता दादरच्या वसंत स्मृती येथे ही बैठक होत आहे. भाजपच्या ओबीसी सेलच्या आज होणाऱ्या बैठकीला भाजपचे ओबीसी सेलचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. केंद्र सरकारची विश्वकर्मा योजना राज्यात राबवण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. केंद्र सरकारने ओबीसींसाठी तयार केलेल्या योजनेचे महाराष्ट्रातील लाभार्थी वाढवण्यावरही भर देण्यात येणार आहे.

    चंद्रशेखर बावनकुळे हे आजच्या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष संजय गाथे, डॉ. आशिष देशमुख, अशोक जीवतोडोंसह भाजपचे अनेक ओबीसी नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील यांच्या मागणीवरही चर्चा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

    Congress-BJP politics of OBC strengthening

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!