वृत्तसंस्था
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळातील चार नवनियुक्त मंत्री अनुक्रमे नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे जनतेशी संवाद साधण्यासाठी आजपासून (ता. १६ ) राज्याच्या वेगवेगळ्या भागात जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली.Jana Aashirwad Yatra of Union Minister Narayan Rane, Bharti Pawar, Dr. Bhagwat Karad and Kapil Patil today
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची यात्रा ठाणे, रायगड जिल्ह्यात ५७० किलोमीटर प्रवास करणार आहे. डॉ. भारती पवार यांची यात्रा पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील पाच लोकसभा मतदारसंघांत प्रवास करेल. डॉ. भागवत कराड यांची यात्रा मराठवाड्यातील सात लोकसभा मतदारसंघांतून तर नारायण राणे यांची यात्रा १९ ऑगस्ट रोजी मुंबईतून सुरू होईल.
वसई- विरार महापालिका क्षेत्र आणि रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत ही यात्रा ६५० किलोमीटर एवढा प्रवास करेल. या यात्रेत हे चारही मंत्री समाजाच्या विविध घटकांचे प्रश्न जाणून घेतील तसेच केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशीही संवाद साधतील. या यात्रांच्या संयोजनाची जबाबदारी आमदार संजय केळकर यांच्याकडे आहे.
Jana Aashirwad Yatra of Union Minister Narayan Rane, Bharti Pawar, Dr. Bhagwat Karad and Kapil Patil today
महत्त्वाच्या बातम्या
- रायगडचे समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले; सलग सुट्या, पर्यटनावरील निर्बंध सैल केल्याचा परिणाम
- पाच हजार दहशतवाद्यांची काबूलच्या तुरुंगातून सुटका; तालिबानचे अफगाणिस्तावर वर्चस्व
- बिहारमध्ये गंगेचे रौद्र रूप धारण केल्याने हाहाकार, महापुराचा तीन लाख लोकांना फटका
- तालिबानच्या घुसखोरीनंतर अमेरिकन अधिकाऱ्यांची हेलिकॉप्टरने सुटका, भारतीयांनाही सुखरुप सोडवले
- डेक्कन क्वीनच्या शिरपेचात विस्टाडोममुळे मानाचा आणखी एक तुरा, निसर्गरम्य सौंदर्य अनुभवल्याने प्रवासी सुखावले