वृत्तसंस्था
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार सुरु केलेली जनआशीर्वाद यात्रा सुरूच राहणार आहे. त्यात कोणताही खंड पडणार नसून ती शुक्रवारपासून(ता. २७) पूर्ववत सुरु राहणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली.Jan Aashirwad Yatra will not be interrupted;Resumes from Friday: Narayan Rane
नारायण राणे यांना न्यायालयाने जमीन दिल्यानंतर आज निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राणे म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन सात वर्ष झाली. या सात वर्षात त्यांनी केलेलं काम सर्वसामान्यांपर्यंत, शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावं हे सांगण्यासाठी ही जनआशीर्वाद यात्रा आयोजित केली होती.
दुसरं म्हणजे मंत्रिमंडळात मला कॅबिनेट मंत्री म्हणून घेतलं. तसेच राज्यातील आणि देशातील अनेक खासदारांना मंत्री बनवण्यात आले. त्यांना मोदींनी सर्वांना आपापल्या राज्यात जनतेचं आशीर्वाद मागण्यास सांगितलं.
तसेच या माध्यमातून खात्याच्या कामास सुरुवात करण्यास सांगितलं. त्यानुसार आम्ही १९ तारखेपासून जनआशीर्वाद सुरु केली. मी कालपर्यंत यात्रेत होतो. आता दोन दिवस गॅप ठेवला आहे. परवापासून पुन्हा यात्रा सुरू होईल. यात कोणताही गॅप पडणार नाही.
Jan Aashirwad Yatra will not be interrupted;Resumes from Friday: Narayan Rane
महत्त्वाच्या बातम्या
- २७ ऑगस्टपासून नारायण राणे पुन्हा जन आशीर्वाद यात्रेवर; पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शरद पवार यांना चिमटे पण… “संयमाने”
- Narayan Rane Press : त्यांनी वापरलेले शब्द असंसदीय नव्हते का?, राणे म्हणाले, दिशा सॅलियन प्रकरणात कोण मंत्री होता, का छडा लागत नाही, कोर्टात जाऊ, मग व्हायचं ते होऊ दे!
- पोलीस दलाची प्रतिमा मलीन केली म्हणून फौजदार निलंबित, हॉटेल मालकाशी हुज्जत घालून मागितले
- नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा, नाशिकच्या गुन्ह्या प्रकरणी कारवाई न करण्याचे आदेश
- नारायण राणेंच्या अटकेचा “डाव” उध्दव ठाकरे – अजित पवारांचा; भाजपच्या निशाण्यावर अनिल परब; केली सीबीआय चौकशीची मागणी