विशेष प्रतिनिधी
नाशिक : लोकसभा निवडणुकीचा मोसम असला तरी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट किंवा अन्य कुठल्याही केंद्रीय तपास संस्था यांचे काम थांबलेले नाही. जिथे बेकायदा मालमत्ता किंवा अन्य गुन्हे घडत आहेत, तिथे केंद्रीय तपास संस्थांचा कायद्याचा बडगा जोरकसपणे सुरू आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने नाशिकमधल्या राका कॉलनी सुराणा ज्वेलर्स वर छापे घालून तब्बल 26 कोटी रुपयांच्या नोटा जप्त केल्या आणि 90 कोटी रुपये किमतीची अन्य मालमत्ता जप्त केली.IT Raid: As many as 26 crore notes + 90 crore property seized in Income Tax raid in Nashak!!
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने नुकतीच नांदेडमध्ये मोठी छापेमारी केली होती. या छापेमारीत तब्बल 170 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. त्यानंतर आता नाशिकमध्येही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. राका कॉलनीतील सुराणा ज्वेलर्स आणि रिअल इस्टेट या व्यवसायिकांवर छापे घालून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने तब्बल 26 कोटी रुपयांच्या नोटा आणि 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त केले.
सुराणा ज्वेलर्स आणि रिअल इस्टेट कंपनीवर नाशिक, नागपूर आणि जळगावचे 50 – 55 अधिकारी एकत्र येऊन कारवाई करावी लागली. जप्त केलेली ही रक्कम मोजण्यासाठी या अधिकाऱ्यांना तब्बल 14 तास लागले आहेत. जप्त केलेली ही रक्कम नेण्यासाठी एकूण 7 कार बोलवाव्या लागल्या. सलग 30 तास ही कारवाई चालू होती. नाशिक, नागपूर, जळगावच्या पथकाने ही कारवाई केली.
50 ते 55 अधिकाऱ्यांनी सुराणा ज्वेलर्स यांची पेढी तसेच त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात छापासत्र सुरू केले होते. त्याचवेळी त्यांच्या राका कॉलनी येथील आलिशान बंगल्यातदेखील स्वतंत्र पथकाने तपासणी सुरू केली होती. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय, खासगी लॉकर्स व बँकांमधील लॉकर्सही तपासण्यात आले. मनमाड आणि नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करण्यात आली.
पुढचा कारवाईचा बडगा कोणावर??
नाशिक शहरात एका सराफा व्यापाऱ्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता सापडल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये धास्ती पसरली आहे. आगामी काळात इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कारवाईचा बडगा कोणावर उचलणार??, असा प्रश्न दबक्या आवाजात विचारला जात आहे.
नांदेडच्या कारवाईत 60 अधिकारी
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 13 मे रोजी नांदेड शहरातही अशाच प्रकारची कारवाई केली होती. तिथून तब्बल 170 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली होती. यामध्ये 14 कोटींची रोख रक्कम आणि आठ किलो सोन्याचे दागिने तसेच अन्य मालमत्ता यांचा समावेश होता. ही कारवाई करण्यासाठी पुणे, संभाजीनगर, नागपूर, नांदेड, परभणी, नाशिक या शहरांतील अधिकारी बोलवण्यात आले होते. या वेगवेगळ्या शहरांतून 25 वाहनांत साधारण 60 पेक्षा अधिक अधिकारी नांदेडमध्ये गेले होते.
IT Raid : नाशकात इन्कम टॅक्स छाप्यात तब्बल 26 कोटींच्या नोटा + 90 कोटींची मालमत्ता जप्त!!
महत्वाच्या बातम्या
- 6 राज्यांत उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट; उष्णतेमुळे राजस्थानमध्ये 2 दिवसांत 13 जणांचा मृत्यू
- 8 राज्यांतील 58 जागांवर 58.82% मतदान; बंगालमध्ये BJP उमेदवारावर हल्ला, पक्षाचा TMC वर आरोप
- चीनची तैवानला युद्धाची धमकी; म्हटले- जोपर्यंत तैवान आमचा भाग होत नाही, तोपर्यंत लष्करी कारवाई करत राहू
- राजकोटच्या गेम झोनमध्ये अग्नितांडव, तब्बल 24 जणांचा होरपळून मृत्यू; मृतांमध्ये 12 मुले; DNA टेस्टद्वारे पटवणार ओळख