• Download App
    नाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकरची धाड, 26 कोटींची रोख आणि 100 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड; नोटा मोजताना अधिकारीही झाले घामाघूम ।IT dept Raid in Pimapalgaon Baswant Onion traders finds over Rs 26 crore in cash and over Rs 100 crore in unaccounted assets

    नाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकरची धाड, 26 कोटींची रोख आणि 100 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड; नोटा मोजताना अधिकारीही झाले घामाघूम

    पिंपळगाव बसवंत बाजार समितीमधील एका कांदा व्यापाऱ्याकडे प्राप्तिकर विभागाने धाड टाकली. यावेळी नोटांचा ढीग पाहून अधिकारीही अवाक झाले. प्राप्तिकर विभागाला यावेळी 26 कोटींहून अधिक रोख रक्कम आणि तब्बल 100 कोटींहून अधिक बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचे सांगितले जात आहे. IT dept Raid in Pimapalgaon Baswant Onion traders finds over Rs 26 crore in cash and over Rs 100 crore in unaccounted assets


    वृत्तसंस्था

    नाशिक : पिंपळगाव बसवंत बाजार समितीमधील एका कांदा व्यापाऱ्याकडे प्राप्तिकर विभागाने धाड टाकली. यावेळी नोटांचा ढीग पाहून अधिकारीही अवाक झाले. प्राप्तिकर विभागाला यावेळी 26 कोटींहून अधिक रोख रक्कम आणि तब्बल 100 कोटींहून अधिक बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचे सांगितले जात आहे.

    पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या 6 कांदा व्यापाऱ्यांच्या 13 जागांवर गुरुवारी प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली. यात सुमारे दीडशे ते दोनशे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या व्यापाऱ्यांचे कार्यालय आणि बँक खात्यांची तपासणी केली. प्राप्तिकर विभागाने रोख रक्कमही जप्त केली. हा पैसा मोजण्यासाठी तब्बल ऐंशी अधिकारी होते. त्यांनी नाशिक, पिंपळगावमधील बँकांमध्ये जवळपास अठरा तास रोकड मोजली. दरम्यान, या कारवाईमुळे राज्यभरातील व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अनेक व्यापारी आणि राजकीय नेत्यांनीही या कारवाईवर आक्षेप घेत कारवाईसाठी निवडलेली वेळ चुकीचे असल्याचे म्हटले आहे.


    कांद्याचा पुन्हा भडका, दिवाळीपर्यंत भाव कमी होण्याची शक्यता नाही, पावसामुळे पिकाचे नुकसान, महागाईत वाढ


    दरम्यान, राज्यात आधीच अतिवृष्टी, मुसळधार पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. शेतात लागवड केलेल्या कांद्याची रोपे खराब झाली आहेत. नैसर्गिक संकटाचा फटका चाळीत साठवलेल्या उन्हाळी कांद्यालाही बसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत आल्याने बाजारभावात मागच्या आठवड्यात वाढ होत कांद्याचे बाजार भाव लासलगाव, पिंपळगाव बाजार समितीमध्ये चार हजार रुपयांच्यावर गेले. त्यामुळे किरकोळ बाजारात दिवाळीच्या तोंडावर कांद्याचा भडका उडाला होता. नाशकातील या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

    IT dept Raid in Pimapalgaon Baswant Onion traders finds over Rs 26 crore in cash and over Rs 100 crore in unaccounted assets

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या फाईलींचे कपाट तुम्हीच मोदी साहेबांना उघडायला सांगा; अजितदादा गटाचा पवारांना टोला!!

    पुरोगामी महाराष्ट्राच्या नुसत्याच तोंडी वाफा; दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी घरात काढल्या झोपा!!; वाचा मतदानाचा आकडा!!

    435 कोटी थकबाकीच्या कारखान्याच्या गोडाऊनला बँकेने ठोकले सील; पवार समर्थकांनी त्याचा संबंध जोडला पवारांच्या सभेशी!!