• Download App
    पुणे, मुंबईत होणार 'आयपीएल'च्या क्रिकेट स्पर्धा कोरोनाचे कारण; 'बीसीसीआय'च्या बैठकीत निर्णय|IPL cricket tournaments in Pune, Mumbai, Decision at BCCI meeting

    पुणे, मुंबईत होणार ‘आयपीएल’च्या क्रिकेट स्पर्धा कोरोनाचे कारण; ‘बीसीसीआय’च्या बैठकीत निर्णय

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पंधराव्या हंगामावर कोरोनामुळे धोका निर्माण झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) याबाबत गंभीर आहे. बोर्डाने शनिवारी सर्व फ्रँचायझींसोबत बैठक घेतली. व्हर्च्युअल बैठकीत या स्पर्धेचे सर्व सामने महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन शहरात घेण्यावर सहमती झाली. IPL cricket tournaments in Pune, Mumbai, Decision at BCCI meeting



    मुंबई आणि पुण्यावर एकमत का?

    मुंबई आणि पुण्यातील चार मैदाने एकमेकांच्या अगदी जवळ असल्याने तेथे कार्यक्रम सहज होऊ शकतात. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम व्यतिरिक्त मुंबईचे वानखेडे स्टेडियम, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (ब्रेबोर्न स्टेडियम) आणि डीवाय पाटील स्टेडियम येथे सामने होऊ शकतात.

    यावेळी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. मुंबई आणि पुण्यात सामने झाल्यावर खेळाडूंना विमानतळावर जावे लागणार नाही. ते बसने प्रवास करू शकतात. अशा परिस्थितीत बाहेरील लोकांपासून अंतर राखले जाईल.

    आयपीएलचा १५ वा हंगाम २७ मार्चपासून (रविवार) सुरू होऊ शकतो. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अंतिम सामना खेळवला जाऊ शकतो. बीसीसीआयला ही स्पर्धा महाराष्ट्रात आयोजित करायची असून पहिला सामना मुंबईत होण्याची शक्यता आहे.

    ही स्पर्धा भारतातच आयोजित करण्यासाठी मंडळ सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बैठकीत चेन्नई सुपर किंग्जच्या एन. श्रीनिवासन, कोलकाता नाईट रायडर्सचा शाहरुख खान, पंजाब किंग्जचा प्रिती झिंटा आणि दिल्ली कॅपिटल्सचा पार्थ जिंदाल यांच्यासह इतर संघांचे मालकही उपस्थित होते.

    IPL cricket tournaments in Pune, Mumbai, Decision at BCCI meeting

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल