या आठवड्यात अभिनेता आविष्कार दारव्हेकर हा घराबाहेर गेला.आविष्कार घरातून बाहेर गेल्याने घरातील अनेक स्पर्धक भावूक झाले. Invent Darvecker out of Big Boss’s house; This will be the entry of the actress
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरात दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. तर दुसरीकडे एक सदस्य घराबाहेर गेला आहे. बिग बॉस मराठी या शोची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. शोचे सुत्रसंचालक महेश मांजरेकर दर आठवड्याला शोमध्ये येऊन घरातील स्पर्धकांची शाळा घेतात.
दर आठवड्याला एक स्पर्धक घराबाहेर जातो.दरम्यान या आठवड्यात अभिनेता आविष्कार दारव्हेकर हा घराबाहेर गेला.आविष्कार घरातून बाहेर गेल्याने घरातील अनेक स्पर्धक भावूक झाले. अविष्कारची घरातून एक्झिट होताच नव्या स्पर्धकाची घरात एन्ट्री झाली आहे.
या अभिनेत्रीची घरात झाली एन्ट्री
नीथा शेट्टी-साळवी या अभिनेत्रीने नुकतीच घारामध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली आहे. आता नीथाच्या येण्याने घरातील समीकरण कशी बदलणार ? नीथा कोणत्या गृपमध्ये जाणार ? की नीथा स्वतः स्वतंत्र तिचा खेळ खेळणार ?याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. प्रोमोमध्ये बिग बॉसच्या मंचावर नीथाच्या डान्सची झलक पाहायला मिळाली होती . प्रमोमध्ये नीथा म्हणली होती की , “मी बिग बॉसच्या घरात धुमाकुळ घालायला येत आहे.” त्यामुळे आता नीथा घरात काय धुमाकुळ घालणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
Invent Darvecker out of Big Boss’s house; This will be the entry of the actress
महत्त्वाच्या बातम्या
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- G20 MEET : पंतप्रधान मोदींची रोमच्या प्रसिद्ध ट्रेवी फाऊंटनला भेट
- ऑक्टोबरमध्ये एक लाखांवर घरांची विक्री; मुद्रांक शुल्कातून राज्य सरकारला एक कोटींवर महसूल
- राकेश टिकेत यांची सरकारला धमकी, तंबू उखडल्यास देशातील सर्व सरकारी कार्यालये जमीनदोस्त करू