• Download App
    आशा कर्मचाऱ्यांची तीव्र निदर्शने !, सहा महिने वेतनाचा पत्ता नाही; कोविड साथीत मोलाची मदत । Intense protests by Asha employees !, no salary for six months ; Valuable help in covid pendamik

    आशा कर्मचाऱ्यांची तीव्र निदर्शने !, सहा महिने वेतनाचा पत्ता नाही; कोविड साथीत मोलाची मदत

    विशेष प्रतिनिधी

    संगमनेर (अहमदनगर) : कोविड महामारीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या आशा कर्मचाऱ्यांचे मानधन गेल्या सहा महिन्यापासून थकविण्यात आले आहे. आशा कर्मचाऱ्यांवरील या अन्यायाच्या विरोधामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रभर सिटू कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची हाक दिली होती. Intense protests by Asha employees !, no salary for six months ; Valuable help in covid pendamik

    सिटूच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी सिटू कर्मचारी संघटनेच्या वतीने आशा कर्मचारी संपावर गेल्या. अकोले व संगमनेर तालुक्यामध्ये सिटू प्रणित आशा कर्मचारी संघटनेच्यावतीने आशा कर्मचाऱ्यांनी तीव्र निदर्शने करून आपला संताप व्यक्त केला. अकोले पंचायत समिती येथे शेकडो आशा कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढत तीव्र निदर्शने केली.



    अकोले येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयांमध्ये मोठ्या संख्येने आशा कर्मचारी एकत्र आल्या. थकित मानधन तातडीने जमा करा, वाढीव मानधन आशा कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा, वाढीव कामाचा बोजा देणे बंद करा या मागण्यांच्या घोषणा देत आशा कर्मचाऱ्यांनी अकोले शहराचा परिसर दणाणून सोडला.

    Intense protests by Asha employees !, no salary for six months ; Valuable help in covid pendamik

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प, फडणवीस विदर्भ आणि तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती

    ठाकरेंना वगळून मुंबईत भाजपचा मराठीचा ठसा, अजितदादा गेल्यानंतर भाजपच्या हातात राष्ट्रवादीच्या नाड्या!!