पुण्यात पार पडली दोन दिवसीय ‘डायग्नॉस्टिका – रिव्होल्यूशन इन हेल्थ केअर’ राष्ट्रीय परिषद
विशेष प्रतिनिधी
पुणे : टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या सेंटर फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज अँड रिसर्च इन आयुर्वेद व अकादमी ऑफ रोगनिदान यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ व २६ मे रोजी डायग्नॉस्टिका – रिव्होल्यूशन इन हेल्थ केअर या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन टिळक आयुर्वेद महाविद्यालय व एम. इ. एस. ओडिटिरिअम कोथरूड, पुणे येथे करण्यात आले. या परिषदेत एकूण ४०० डॉक्टरांनी सहभाग घेतला. Integrated Approach is the need of the hour in the medical field Dr Madhuri Kanitkar
परिषदेच्या उदघाटन प्रसंगी ऑर्गनायझिंग चेअरमन डॉ. सदानंद देशपांडे यांनी प्रास्ताविक व सर्व उपस्थितांचे स्वागत केले आणि टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील प्रगतीविषयक माहिती दिली. डॉ. सौ मंजिरी देशपांडे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी, यांनी डायग्नोस्टिका या परिषदेमध्ये आधुनिक चाचण्यांचे आयुर्वेदीय इंटरप्रिटेशन व त्यानुसार १६० संशोधन निबंधांचे सादरीकरण २५ तारखेस झाल्याची माहिती दिली.
उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे, डॉ. मुकुल पटेल, कुलगुरू, जामनगर आयुर्वेद विद्यपीठ, यांनी परिषदेच्या आयोजनाबद्दल अभिनंदन केले. आयुर्वेदातील संशोधनाबद्दल माहिती देताना भस्म औषधी निर्माण, सर्पविषाचा त्यामधील उपयोग व उपयुक्तता तपासणीसाठीचा उंदरांमधील संशोधनाचा दाखला देत आयुर्वेद निदान व चिकित्सा करण्याविषयी आग्रह धरला.
कार्यक्रमाच्या अतिथी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू, लेफ्टनंट जनरल, डॉ. माधुरी कानिटकर यांनी व्याधी निदान व चिकित्सा या विषयी इंटिग्रेटेड रिसर्चची आवश्यकता व आरोग्य विज्ञानातील महत्व सांगत परिषदेने केलेल्या इंटिग्रेटेड अँप्रोचच्या प्रयत्नाबद्दल समाधान व्यक्त केले.
डायग्नोस्टिक: इंटिग्रेटेड अप्रोच टू हेल्थ केअर या स्मरणिकेचे प्रकाशन -.
एन सी आय एस एम, बोर्ड ऑफ एथिसिस अँड रिसर्च चे अध्यक्ष डॉ राकेश शर्मा कार्यक्रमाचे विशेष अतिथी यांनी नैदानिक चाचण्यांचा आयुर्वेद निदान व चिकित्सेमध्ये उपयोग करून त्याची माहिती शास्त्रिय निबंधाच्या स्वरूपात एव्हिडन्स बेस्ड आयुर्वेद म्हणून एन सी आय एस एम संस्थेला सादर करावी असे आवाहन केले. तर, अकॅडमी ऑफ रोगनिदानचे सचिव व एन सी आय एस एम, बोर्ड ऑफ आयुर्वेद चे सदस्य डॉ अतुल वार्ष्णेय यांनी अकादमीचा उद्देश, इंटिग्रेटेड हेल्थ केअर, रोगनिदानच्या डॉक्टरांनी स्वतःची लॅब उघडून त्याआधारे आयुर्वेद पद्धतीने मांडणी करावी असे नमूद केले.
याशिवाय कै. एम. एस. बघेल, माजी कुलगुरू जामनगर आयुर्वेद विद्यापीठ, यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बेस्ट थिसीस अवॉर्ड्स ची घोषणा अकॅडमी ऑफ रोगनिदानचे अध्यक्ष डॉ. पवनकुमार गोदातवार यांनी केली व श्रीमती म्रिदू बघेल यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. तसेच, बेस्ट पेपर , बेस्ट पेपर प्रेसेंटेशन व बेस्ट पोस्टर पारितोषिकांचे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दिलीप पुराणिक यांनी शतक महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांविषयी माहिती दिली. आयुर्वेद क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी रोगनिदान तज्ज्ञांनी लॅब चालवून रिपोर्ट्सना मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले, संज्ञाहरण व क्षकिरण आयुर्वेदाचे एम डी कोर्स पुन्हा चालू करण्याची मागणी केली.
Integrated Approach is the need of the hour in the medical field Dr Madhuri Kanitkar
महत्वाच्या बातम्या
- नवीन संसद भवनात ‘एक भारत, सर्वोत्तम भारत’ची झलक; महाराष्ट्रातून सागवान, राजस्थानचे संगमरवर तर उत्तर प्रदेशातून कार्पेट!
- समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर दुसऱ्या टप्प्याचे शिंदे – फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण
- मोदी सरकारची 9 वर्षे : काँग्रेसचे 9 प्रश्न; सरकारचे 9 निर्णय!!
- सावरकर जयंती निमित्त फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वस्तीगृहातली खोली सामान्यांसाठी खुली..