• Download App
    मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडून राष्ट्रध्वजाचा अवमान, रश्मी ठाकरे यांच्याविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार|Insult to the national flag by the wife of the Chief Minister

    मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडून राष्ट्रध्वजाचा अवमान, रश्मी ठाकरे यांच्याविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याची तक्रार अ‍ॅड. डॉ. जयश्री पाटील यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. रश्मी ठाकरे या दैनिक ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राच्या संपादिका आहेत.Insult to the national flag by the wife of the Chief Minister

    प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचे अ‍ॅड. पाटील यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करून रश्मी ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अ‍ॅड. पाटील यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे केली आहे.



    प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या देखील त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. राष्ट्रगीतानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे राष्ट्रध्वजाला सलामी देत होते.

    मात्र, त्यावेळी रश्मी ठाकरे या स्तब्ध उभ्या होत्या. त्यांनी ध्वजाला सलामी दिलेली नाही. यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झालेला आहे. तसेच, त्यांच्या या कृतीमुळे लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत, असे अ‍ॅड. पाटील यांनी म्हटले आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी करून रश्मी ठाकरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

    प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या.

    Insult to the national flag by the wife of the Chief Minister

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस