• Download App
    Fadnavis राज्यात नावीन्यता शहराची स्थापना करणार; स्टार्टअप

    Fadnavis : राज्यात नावीन्यता शहराची स्थापना करणार; स्टार्टअप धोरणाचा नवीन मसुदा तयार; फडणवीसांची राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कार्यक्रमात घोषणा

    Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Fadnavis सिडबी (SIDBI) स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्ट अपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक प्रादेशिक विभागाला तीस कोटी रुपयांची तरतूद करणार आहे. काळाची गरज ओळखून स्टार्ट अप धोरणाचा नवीन मसुदा तयार केला आहे. उद्योजकांना सूचनांसाठी हा मसुदा उपलब्ध करून देण्यात आला असून राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.Fadnavis

    बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. AI तंत्रज्ञानाच्या यावेळी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दीप प्रज्वलन मुख्यमंत्री यांनी केले.



    या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, नवे उद्योजक आणि महिला उद्योजकांच्या नवकल्पना सक्षम करून महाराष्ट्राची उन्नती करण्यात येणार आहे. देशात स्टार्टअप सुरू झाले तेव्हा 471 स्टार्ट अप होते आज देशात एक लाख 57 हजार आहेत. राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त मला अभिमानाने सांगावेसे वाटते की महाराष्ट्र केवळ भारताच्या स्टार्टअप क्रांतीत सहभागी नाही तर त्याचे नेतृत्व करत आहे. राज्यात 26000 स्टार्ट अप आहेत. आपण असे अभियान राबवित आहोत की ज्यामध्ये महिला स्टार्टअप मध्ये सर्व पदांवर असतील. देशात जास्त महिला डायरेक्टर असलेले महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र पहिल्या सात राज्यात आहे असेही ते म्हणाले.

    मुख्यमंत्री म्हणाले की, उद्योजक, दूरदर्शी गुंतवणूकदार,धोरणकर्ते, इन्क्युबेटर्स, विद्यापीठे हे उद्योग क्षेत्रातील बदलाचे प्रणेते आहेत. इज ऑफ डूईंग बिझनेसमुळे उद्योग कमी वेळात सुरू करण्यामध्ये पारदर्शकता आली आहे. गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य हे देशात पहिले आहे. भविष्यातही मानवी हस्तक्षेप न ठेवता पारदर्शक पद्धतीने उद्योजकांना राज्यात शासना बरोबर उद्योग सुरू करण्याची संधी प्राप्त करून दिली जाणार आहे. उद्योग सुरू करताना मुंबई पुणे मध्ये पोषक वातावरण आहे. मुंबई निधीमध्ये आघाडीवर असून, पुणे तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे केंद्र आहे. आपली टियर-२ आणि टियर-३ शहरे महाराष्ट्राच्या विकासात मोठा हातभार लावत आहेत. नाशिक, नागपूर, संभाजीनगर आणि कोल्हापूर ही शहरे स्टार्टअप्सना प्रोत्साहन देत आहेत आणि इकोसिस्टम निर्माण करतात असेही ते म्हणाले.

    विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स महाराष्ट्राच्या नवकल्पना स्टार्टअपला बळकटीकरण देणाऱ्या संस्था आहेत. ग्रामीण भागातील नव कल्पना असलेल्या तरुणांनाचा उद्योगात सहभाग वाढवणार असून, उद्योजकांना मार्गदर्शन, नेटवर्किंग, कायदेशीर सहाय्य इत्यादी सेवा देणार्य इन्क्युबेटर्सना स्टार्टअप सुरू करण्यासाठी सहकार्य करणार.शासकीय आणि खासगी विद्यापीठे या भविष्यातील स्टार्ट अपला बळकटीकरण देणाऱ्या संस्था आहेत. विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स हे नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी निर्माण करणारे बनवणार असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

    Innovation city to be established in the state; New draft of startup policy prepared; Fadnavis’ announcement at National Startup Day program

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस