प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर चिंचवड शहरात शाईफेक करण्यात आली आहे. पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन ही शाईफेक करण्यात आली आहे. शाईफेक करणा-या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील पिंपरी चिंचवड येथून एका कार्यक्रमातून बाहेर येत असताना, अचानक एका व्यक्तीने शाईफेक केली. यावेळी चंद्रकांत पाटील जागेवर धडपडले यावेळी आजूबाजूच्यांनी त्यांना पकडले. Ink throw on Chandrakant Patals in Chinchwad
शुक्रवारपासूनच अनेक संघटनांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चंद्रकांत पाटील शनिवारी पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते, यावेळी एका व्यक्तीने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली. यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
महात्मा फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुदान न मागता भीक मागून शाळा सुरू केल्या, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभर संतापाची लाट पसरली आहे. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर विरोधकांनीदेखील तीव्र शब्दांत आक्षेप व्यक्त केला.
Ink throw on Chandrakant Patals in Chinchwad
महत्वाच्या बातम्या
- बाजारातले बैल ते साहित्यिकांनी वातावरण बदलावे; शिवसेनेचा एक राजकीय प्रवास
- हिमाचलमध्ये सुखविंदर सिंह सुक्खू यांचे नाव पुढे येताच काँग्रेस हायकमांड विरुद्ध प्रतिभा सिंह समर्थकांची नारेबाजी
- एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा; शिंदे – फडणवीस सरकारची २०० कोटींची मदत
- जैश ए मोहम्मदचा दहशतवादी कमांडर आशिक अहमद नेंगरूचे घर प्रशासनाकडून उध्वस्त