• Download App
    CM Fadnavis देशातील माध्यम, मनोरंजन उद्योग 2029 पर्यंत 50 बिलियन

    CM Fadnavis : देशातील माध्यम, मनोरंजन उद्योग 2029 पर्यंत 50 बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचणार – मुख्यमंत्री फडणवीस

    CM Fadnavis

    ‘वेव्ह्स 2025’ : माध्यम अन् मनोरंजन क्षेत्राचे भविष्यातील चित्र निश्चित करण्याच्या दृष्टीने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचेही सांगितले.


    विशेष प्रतिनिधी

    CM Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथे ‘वेव्ह्स 2025’ संदर्भात परराष्ट्र मिशनचे राजदूत आणि उच्चायुक्तांसाठी आयोजित करण्यात आलेले सत्र संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.CM Fadnavis

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘वेव्ह्स 2025’ संदर्भात परराष्ट्र मिशनच्या राजदूत आणि उच्चायुक्तांसाठी आयोजित सत्रात सहभागी होणे आनंदाचा आणि मानाचा क्षण आहे. तंत्रज्ञान, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा संगम असलेला हा मंच माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राचे भविष्यातील चित्र निश्चित करण्याच्या दृष्टीने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.



    तसेच, कथाकथन, नवोन्मेष आणि सर्जनशीलतेने ओतप्रोत भारताची आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजन राजधानी असलेली मुंबई ‘वेव्ह्स 2025’ या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी आदर्श ठिकाण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. शिवाय, येत्या 1 ते 4 मे या कालावधीत मुंबई, महाराष्ट्र येथे ‘वेव्ह्स 2025’ आयोजित करण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्राचीन काळापासून आजच्या डिजिटल युगापर्यंत संस्कृतीला आकार देत भारत नेहमीच कथा सांगणाऱ्यांचा देश राहिला आहे. देशातील माध्यम आणि मनोरंजन उद्योगात मोठी वाढ होत असून 2029 पर्यंत हा उद्योग 50 बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचणार आहे. 60 पेक्षा जास्त कार्यरत ओटीटी मंच आणि 2023 मध्ये 5.8 बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीतून भारताचा जागतिक प्रभाव दिसून आला आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपट आणि समृद्ध डिजिटल उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्राची याद्वारे जगभरात अद्वितीय ओळख निर्माण होत आहे.

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नवोन्मेषाला चालना देणाऱ्या ‘वेव्ह्स 2025’ उपक्रमामुळे कथा सांगण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या नवोदित निर्मात्यांना प्रोत्साहन मिळेल. हा भविष्यकाळ पाहण्यासाठी आणि त्यात योगदान देण्यासाठी उत्सुक आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव, परराष्ट्र मिशनचे राजदूत आणि उच्चायुक्त तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

    Indias media and entertainment industry to reach 50 billion by 2029 said CM Fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा