• Download App
    पुण्यात वाटमारीचे प्रकार वाढले; दारूच्या पैशासाठी शस्त्राचा धाक दाखवून लूटमार। Increasing forms of road rage In Pune City

    पुण्यात वाटमारीचे प्रकार वाढले; दारूच्या पैशासाठी शस्त्राचा धाक दाखवून लूटमार

    वृत्तसंस्था

    पुणे : पुण्यात वाटमारीचे प्रकार वाढत चालले आहेत. नागरिकांना रस्त्यात गाठून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून दारूसाठी पैसे मागून लुबाडले जात आहे. बिबवेवाडी आणि हिंगणे खुर्द येथे जबरी चोरीचे प्रकार वाढल्याने नागरिकाममध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. Increasing forms of road rage In Pune City
    हिंगणे खुर्द येथील महादेवनगर परिसरात पार्टीसाठी पैसे पाहिजेत म्हणून एका तरुणाच्या गळ्याला कोयता लावून त्याच्या खिशातील पैसे काढून घेतले. याप्रकरणी सागर ढेबे (रा. साईनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कृष्णा छगन मरगळे (वय १९, रा. साईनगर) यांनी सिंहगड ठाण्यात फिर्याद दिली.



    कृष्णा हा मित्रांबरोबर महादेवनगर येथील एका स्वीट मार्टसमोर १३ जून रोजी दुपारी थांबला होता. त्यावेळी सागर तेथे आला व त्याने मला पार्टीला पानशेतला जायचे आहे. तुझ्याकडील सर्व पैसे दे नाही तर तुला मारून टाकीन, अशी धमकी देऊन कोयता गळ्याला लावला. कृष्णाने नकार देताच त्याने मी वडगावचा भाई आहे, असे म्हणत कोयता हातात फिरवून कृष्णाच्या खिशातील २ हजार १०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

    बिबवेवाडीतील यश लॉन्सकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीस्वाराला चोरट्यांनी अडवून दमदाटी केली. त्यांच्याजवळील मोबाईल व जेवणाचा डबा हिसकावून घेतला. अविनिश निवृत्ती मोरडे (वय ५७, रा. बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलिस तपास करत आहेत.

    Increasing forms of road rage In Pune City

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना