• Download App
    Maharashtra Corona Update : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले , शुक्रवारी 53,249 जण खडखडीत बरे ; 39,923 जण बाधित|Increased patient recovery in the state,53,249 people recovered from the crash on Friday; 39,923 people affected

    Maharashtra Corona Update : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले , शुक्रवारी 53,249 जण खडखडीत बरे ; 39,923 जण बाधित

    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.53,249 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर  39,923 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.  आजपर्यंत एकूण 4707980 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.68% एवढे झाले आहे.Increased patient recovery in the state,53,249 people recovered from the crash on Friday; 39,923 people affected

    राज्यात शुक्रवारी 695 रुग्णांच्या मृत्यू झाला. सध्या मृत्यूदर 1.5% आहे.आजपर्यंत तपासलेल्या 30602140 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5309215 (१७.३5 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत.



    सध्या राज्यात 3482425 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 28312 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  राज्यात आज एकूण 519254 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    मुंबईतही दिलासादायक चित्र

    मुंबईत रुग्णसंख्येत पुन्हा घट झाली. मुंबईत 1657 रुग्णांची नोंद झाली तर 2572 जणांना डिस्चार्ज दिला आहे.  सध्या मुंबईत 37 हजार 656 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  मुंबईत गुरुवारी 1,946 रुग्णांची नोंद झाली होती. तर 2,037 जणांना डिस्चार्ज दिला होता. मुंबईचा डबलिंग रेट हा आता 199 दिवसांवर तर बरे होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवरआहे.

    पुण्यात रुग्णसंख्येत घट कायम

    पुणे शहरात शुक्रवारी 1 हजार 836 रुग्णांची नोंद झाली असून 3 हजार 318 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 24 हजार 990 झाली. 18 एप्रिलपासून नव्या रुग्णसंख्येत होणारी घट कायम आहे.

    Increased patient recovery in the state,53,249 people recovered from the crash on Friday; 39,923 people affected

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!