• Download App
    पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ , शाळा पुन्हा ऑनलाइन सुरू करा ; महापौर मुरलीधर मोहोळ करणार उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी|Increase in Corona patient population in Pune, resume school online; Mayor Muralidhar will make a demand to the Deputy Chief Minister

    पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ , शाळा पुन्हा ऑनलाइन सुरू करा ; महापौर मुरलीधर मोहोळ करणार उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

    पुण्यामधील कोरोना रुग्णसंख्येत 27 डिसेंबर ते 1 जानेवारी या 5 ते 6 दिवसांत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.Increase in Corona patient population in Pune, resume school online; Mayor Muralidhar will make a demand to the Deputy Chief Minister


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.दरम्यान पुण्यामधील कोरोना रुग्णसंख्येत 27 डिसेंबर ते 1 जानेवारी या 5 ते 6 दिवसांत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

    गेल्या आठ दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या चौपट झाली असल्याची माहिती पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.दरम्यान आज पुणे महापालिकेच्या कोरोना आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.यावेळी त्यांनी ही माहिती दिली.



    तसंच शाळा ॲानलाईन करावी अशी मागणी महापालिका करणार,दरम्यान क्वारंटाईनसाठी पुन्हा हॉटेल सुरु करणार,तसेच वाढीव निर्बंधाबाबत उद्या अजित पवारांसमोर चर्चा करणार त्यावेळी शाळांबाबत देखील चर्चा करणार असून पालकांची भुमिका ॲानलाईन शाळा सुरु करण्याची आहे असं त्यांनी सांगितलं.

    पुढे मोहोळ म्हणाले की , नव्याने कोरोनाबाधित झालेल्यांपैकी लसीकरण झालेल्यांची माहिती घेतली जात असून बाधीत झालेल्या 309 पैकी 252 लोकांनी दोन्ही डोस घेतले असल्याचे समजत असल्याचही ते म्हणाले.तसेच ‘महापालिका कोरोना रुग्ण वाढले तरी परिस्थिती हाताळण्यास सुसज्ज आहे.दरम्यान जम्बोचे स्ट्रक्चरल ॲाडिट केले आहे. 24 तासांत मशिनरी करण्याचे नियोजन गरज भासल्यास सुरु करणार’ असही ते म्हणाले.

    Increase in Corona patient population in Pune, resume school online; Mayor Muralidhar will make a demand to the Deputy Chief Minister

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा