• Download App
    Nagpur नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा - गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

    नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सरिता गंगाधरराव फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन, नागपूर द्वारा निर्मित गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे आज नागपूर येथे लोकार्पण पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. Inauguration of Gangadharrao Fadnavis Diagnostic Center in Nagpur

    या डायग्नोस्टिक सेंटरच्या उभारणीसाठी आमदार संदीप जोशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या परिश्रमांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले. तसेच अल्पावधीत उभ्या राहिलेल्या केंद्राला स्व. गंगाधरराव फडणवीस यांचे नाव देण्यात आले असून वडिलांच्या कार्याचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडल्याचे आणि त्यांच्याकडून समाजकार्याची प्रेरणा मिळाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.



    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आरोग्य तपासण्यांसाठीची आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असून लोकांना माफक दरात आरोग्यसेवा दिली जाणार आहे. तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वांना किफायतशीर आणि शक्यतो मोफत उपचार उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून नागपूरसह आसपासच्या भागातील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळणार असून भविष्यात या केंद्राचा विस्तार करण्यासाठी आमदार संदीप जोशी पुढाकार घेतील, असा विश्वास व्यक्त करत या कार्यात सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

    यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार माया ईवनाते, आमदार संदीप जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

    Inauguration of Gangadharrao Fadnavis Diagnostic Center in Nagpur

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rupali Thombre : रूपाली ठोंबरे यांचा गंभीर आरोप- रूपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, अशोक खरातच्या विकृतीचा नवा व्हिडिओ

    Navnath Ban :संजय राऊतांवर भाजपचा पलटवार, अर्थव्यवस्थेची चिंता राऊतांनी करू नये, मोदी सक्षम, खरातप्रकरणी ठाकरेंना सहआरोपी करायचे का?

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंसह 9 जणांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ संपणार; आज सभागृहात निरोप, 13 मे रोजी टर्म होणार पूर्ण