डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला ६० ते ७० टक्के भाजली असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. In Wardha, a female home guard poured kerosene on herself in front of a police officer’s house
विशेष प्रतिनिधी
वर्धा : वर्धा शहरालगत काल रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे.वर्धा शहराजवळ असलेल्या पिपरी-मेघे येथील पोलीस कॉटर वसाहतीमध्ये आयसीबीला कार्यरत असलेले पोलीस नवनाथ मुंडे यांच्या घराच्या दरवाज्यासमोर एका महिला होमगार्डने स्वतःवर रॉकेल ओतून जाळून घेतले आहे.
रविवारी (९ जानेवारी) रात्री ९:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पोलीस कॉर्टर्स असलेल्या परिसरातील शरद बिल्डिंगमध्ये हा सगळा प्रकार घडला असल्याची प्राथमिक मिळत आहे.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वर्धा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी पंचनामा करुन या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तिचा जबाब नोंदवता आलेला नाही.परंतु पोलीस पुढील तपास करीत आहेत.
घटना काय घडली?
पोलीस कॉटर वसाहतीमध्ये अचानक इमारतीतील एका फ्लॅटमधून मोठ्या प्रमाणात धूर येत होता.दरम्यान परिसरातील रहिवाशांनी त्या फ्लॅटच्या दिशेने धाव घेतली. यावेळी एक अनोळखी महिला फ्लॅट क्रमांक F२ च्या दरवाज्यासमोर जळत होती.दरम्यान काही नागरिकांनी तात्काळ आग विझवून महिलेला वर्ध्यातील सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
यावेळी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला ६० ते ७० टक्के भाजली असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी तिला नागपूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवलं आहे.दरम्यान संबंधित महिला ही होमगार्ड आहे. मात्र, तिने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरासमोर स्वत:ला का जाळून घेतले? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
In Wardha, a female home guard poured kerosene on herself in front of a police officer’s house
महत्त्वाच्या बातम्या
- मला अटक केल्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल, लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अभिनेत्याची पोलीसांनाच धमकी
- नागरिकांच्या संतापानंतर राज्य सरकारचे एक पाऊल मागे, जिम आणि ब्युटीपार्लरवरील निर्बंध मागे
- महाविकास आघाडीच्या आरोग्य राज्य मंत्र्यांनीच मोडला जमावबंदीचा आदेश
- हिंदूंची घरे जळणार असतील तर मुसलमानांची घरे थोडीच सुरक्षित राहतील, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा