• Download App
    पवई आयआयटी गेटसमोरच्या पडीक जागेत भीषण आग, कचरा, बांबू,प्लास्टिक भस्मसात । In the wasteland of Powai IIT Gate Terrible fire, garbage, bamboo, plastic burnt

    पवई आयआयटी गेटसमोरच्या पडीक जागेत भीषण आग, कचरा, बांबू,प्लास्टिक भस्मसात

    प्रतिनिधी

    मुंबई : पवई आयआयटी गेट समोर असलेल्या एक पडीक जागेत आज पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागली होती. या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक आणि बांबू पडलेले होते. ते पेटल्याने आग काही वेळेत इतरत्र भडकली. In the wasteland of Powai IIT Gate Terrible fire, garbage, bamboo, plastic burnt



    स्थानिकांनी याची माहिती अग्निशमन दलाला देताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.काही वेळेतच अग्निशमन दलाच्या जवांनानी या आगीवर नियंत्रण मिळविले.आग लागली होती त्या ठिकाणी आजूबाजूला मोठी रहिवासी वस्ती आहे.सुदैवाने आगीवर नियंत्रण लवकर मिळविल्याने आग आजूबाजूच्या वस्तीत पसरली नाही आणि मोठी हानी टळली आहे.आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.

    In the wasteland of Powai IIT Gate Terrible fire, garbage, bamboo, plastic burnt

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!