• Download App
    पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भावी मुख्यमंत्र्यांची वीणा नाना पटोलेंच्या गळ्यात!! In the Vitthal temple of Pandharpur, the harp of the future Chief Minister is around the neck of Nana Patole

    पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भावी मुख्यमंत्र्यांची वीणा नाना पटोलेंच्या गळ्यात!!

    विशेष प्रतिनिधी 

    सोलापूर : लाडू वर नाव लिहून झाले. ते मोठमोठ्या बोर्डांवर पण झळकले. पण काँग्रेसचे प्रांताचे अध्यक्ष नाना पटोले यांना अजून त्याप्रमाणे मुख्यमंत्री होणे जमलेले नाही. पण म्हणून कार्यकर्त्यांचा उत्साह काही कमी झालेला नाही. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात नाना पटोले दर्शनाला गेले तेव्हा कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्र्यांची वीणा नानांच्या गळ्यात घातली. नानांनी ती सन्मानपूर्वक गळ्यात घालून घेतली. पण त्याच वेळी आपण राजकीय वास्तवाचे भान विसरलो नाही हे त्यांनी एक वक्तव्य करून दाखवून दिले. In the Vitthal temple of Pandharpur, the harp of the future Chief Minister is around the neck of Nana Patole

    वेळेच्या आणि नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही, ही राजकीय गुरू विलासराव देशमुख यांची शिकवण मी डोक्यात ठेवली आहे. माझ्या नशिबात असेल तर जे व्हायचे ते होईल, असे म्हणत नाना पटोले यांनी आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत आशावादी असल्याचे संकेत विठ्ठल मंदिरातून दिले.

    नाना पटोले विठ्ठल दर्शनासाठी आले असता काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या गळ्यात चक्क भावी मुख्यमंत्री लिहिलेली वीणा घातली. नानांनी थेट ही वीणा गळ्यात घालूनच विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यामुळे, आता महाविकास आघाडीत नानांच्या या कार्यकर्ता प्रेमावरुन वादाची ठिगणी उडते की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.



    महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अगदी विश्वजीत कदम हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गटांचे नेते आपापल्या नेत्यांचे मोठमोठे फोटो भावी मुख्यमंत्री म्हणून बोर्डांवर झळकवत असतात. पण यातल्या उद्धव ठाकरे वगळता कोणाला मुख्यमंत्रीपदाची संधी अजून मिळालेली नाही. पण म्हणून कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नेत्यांची आशा मावळलेली नाही.

    नानांच्या समर्थकांनी त्यांच्या वाढदिवशी भल्या मोठ्या लाडू वर भावी मुख्यमंत्री असे लिहून त्यांची लाडू तुला केली होती त्या पाठोपाठ आता त्यांच्या गळ्यात भावी मुख्यमंत्र्यांची वीणा घातली. पण त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवून ती जिंकण्यापूर्वीच मुख्यमंत्रीपदाची मोठी शर्यत लागली.

    लोकसभेच्या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला असून आज नाना पटोले आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठल दर्शनासाठी आले असताना काँग्रेस कार्यकर्ते आणि धवलसिंह मोहिते पाटील मित्रमंडळाने नानांच्या गळ्यात भावी मुख्यमंत्र्यांची वीणा घातली.

    भुजबळ-पवार भेटीवरही भाष्य

    राज्यातील शिंदे सरकारवर सडकून टीका करत, राज्य सरकारनेच महाराष्ट्र पेटवला असा थेट आरोप पटोले यांनी केला आहे. सरकार सत्ता चालवायच्या लायकीचे नाही, आज त्यांच्याच एका जेष्ठ मंत्र्यांनी हे दाखवून दिल्याचा टोलाही त्यांनी लगावला. भुजबळ आणि पवार यांच्या आजच्या भेटीचा उद्देशच तो होता, हे सरकार लायकीचे नाही हेच त्यांनी दाखवून दिल्याचा दावा पटोले यांनी केला.

    संघर्ष संपवायचे सोल्यूशन आमच्याकडे

    मराठा-ओबीसी संघर्ष संपवायचे सोल्युशन आमच्याकडे आहे, तुम्हाला जमत नसेल तर ते आम्ही करतो. त्यासाठी पहिल्यांदा  जातनिहाय जनगणना करावी लागेल, त्यानंतरच हे सर्व प्रश्न सुटू शकतील. मात्र, पंतप्रधान मोदी तयार नसल्याने हा वाद संपणारच नाही, असा दावा पटोले यांनी केला. या वादात सरकारच पेट्रोल टाकत असल्याची परिस्थिती आपण पाहत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये मराठा समाजाला आरक्षण देतो असे सांगितले होते, मग द्या आता, असेही पटोले यांनी म्हटले. तर, यावर मार्ग आहे, मात्र या सरकारला मार्गच काढायचा नसल्याचा आरोपही पटोले यांनी केला.

    In the Vitthal temple of Pandharpur, the harp of the future Chief Minister is around the neck of Nana Patole

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस