विशेष प्रतिनिधी
पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वाढली आहे. शहरातील एकाच सोसायटीमध्ये एकाच वेळी ४० जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे संपूर्ण शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.In the society of Pimpri-Chinchwad Corona infection in 40 people
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढूनलॉकडाऊन होते की काय ? अशी भीती पिंपरी-चिंचवडकरांना वाटू लागली आहे.राहाटणी परिसरातील मिरचंदानी पाम्स हाऊसिंग सायटीमध्ये एकाच वेळी चाळीस रुग्ण एकाच दिवशी आढळल्याने संपूर्ण चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा उद्रेक होऊ नये म्हणून संपूर्ण सोसायटी सील करण्यात आली आहे.
- पिंपरी-चिंचवडच्या सोसायटीत ४० जणांना कोरोना
- रहाटणीतील मिरचंदानी पाम्स सोसायटीतील घटना
- शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्याची धास्ती
- लॉकडाऊन होते की काय ? नागरिकांना भीती
- संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण सोसायटीला सील