• Download App
    काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणात महाविकास आघाडीला 45 जागा; पण तटस्थ वृत्त वाहिनांच्या सर्वेक्षणात भाजप महायुतीला 36 जागा!! In the internal survey of the Congress, Mahavikas Aghadi got 45 seats

    काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणात महाविकास आघाडीला 45 जागा; पण तटस्थ वृत्त वाहिनांच्या सर्वेक्षणात भाजप महायुतीला 36 जागा!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : लोकसभा निवडणुका आठ महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना सर्वत्र मत चाचण्यांची गर्दी होऊन राहिली आहे. काँग्रेसने महाराष्ट्रात केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात महाविकास आघाडी महायुतीवर नुसतीच मात करताना दाखवलेली नाही, तर महाविकास आघाडीला तब्बल 45 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर तटस्थ असलेल्या वृत्त वाहिन्यांच्या सर्वेक्षणात मात्र भाजप प्रणित महायुतीला लोकसभेच्या 36 जागा मिळण्याची शक्यता वर्तविली आहे. In the internal survey of the Congress, Mahavikas Aghadi got 45 seats

    काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणाचा निष्कर्ष काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतःच जाहीर केला. महाविकास आघाडीसाठी महाराष्ट्रात अत्यंत अनुकूल वातावरण आहे. लोकसभेच्या 45 जागा मिळू शकतात, असे अंतर्गत सर्वेक्षणातून दिसते, असे नाना पटोले म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर टाइम्स नाव ए टी जी या वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात भाजप प्रणित महायुतीला 32 ते 36 जागा मिळतील असे भाकीत वर्तविले आहे.



     

    महायुतीमध्ये आता अजित पवारांची राष्ट्रवादी जोडली गेली आहे. त्याचा नेमका किती फायदा महायुतीला होईल याबाबत अद्याप तरी स्पष्टता आलेली नाही. पण टाइम्स नाऊ – इटीजीच्या सर्वेक्षणात भाजपला मात्र 48 पैकी 22 ते 24 जागा मिळतील, असा निष्कर्ष आला आहे. भाजपकडे सध्या महाराष्ट्रातून 23 खासदार आहेतच. यापैकी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याने ती जागा रिकामी आहे. याचा अर्थ भाजपकडे महाराष्ट्रात सध्या 22 खासदार आहेत.

    या पार्श्वभूमीवर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला 22 ते 24 जागा मिळणार, असे भाकीत टाइम्स नाऊ इटीजीच्या सर्वेक्षणात वर्तविण्यात आल्याने भाजपचे कोणतेच नुकसान होत नसल्याचाच निष्कर्ष यातून निघतो आहे. काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणाच्या निष्कर्षाच्या पार्श्वभूमीवर तटस्थ वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षाला विशेष महत्त्व आहे.

    In the internal survey of the Congress, Mahavikas Aghadi got 45 seats

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य