• Download App
    पुण्यात पहिल्या लाटेतच ६९ टक्के नागरिकांना कोरोना, सिरो सर्व्हेमध्ये झाले उघड|In the first wave in Pune, 69 per cent citizens were exposed in Corona, Siro survey

    पुण्यात पहिल्या लाटेतच ६९ टक्के नागरिकांना कोरोना, सिरो सर्व्हेमध्ये झाले उघड

    कोरोनाच्या पहिल्या लाटेतच पुण्यातील ६९ टक्के नागरिकांमध्ये कोरोना अ‍ॅँटीबॉडीज आढळल्या होत्या. सिरो सर्व्हेमध्ये ही माहिती पुढे आली आहे. यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील आकडेवारी मिळविल्यास हा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

    कोरोनाच्या पहिल्या लाटेतच पुण्यातील ६९ टक्के नागरिकांमध्ये कोरोना अ‍ॅँटीबॉडीज आढळल्या होत्या. सिरो सर्व्हेमध्ये ही माहिती पुढे आली आहे. यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील आकडेवारी मिळविल्यास हा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.In the first wave in Pune, 69 per cent citizens were exposed in Corona, Siro survey


    विशेष प्रतिनिधी

    हैदराबाद : कोरोनाच्या पहिल्या लाटेतच पुण्यातील ६९ टक्के नागरिकांमध्ये कोरोना अ‍ॅँटीबॉडीज आढळल्या होत्या. सिरो सर्व्हेमध्ये ही माहिती पुढे आली आहे. यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील आकडेवारी मिळविल्यास हा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

    डिसेंबर 2020 पर्यंत देशातील बारा शहरांमध्ये झालेल्या सिरो सर्वेक्षणात 31 टक्के लोकांमध्ये कोरोना विषाणू अँटीबॉडीज सापडल्या आहेत. याबाबत करण्यात आलेल्या चाचणीमध्ये कोरोना विषाणू अँटीबॉडीसाठी 31 टक्के लोक पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.



    या सर्वेक्षणात पुण्यासह देशातील बारा शहरांचा समावेश आहे.या माहितीच्या आधारे हे लक्षात येते की, शहरी लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोक कोरोना विषाणूचा संक्रमणाच्या विळख्यात सापडले होते,

    मात्र, संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्हिटीचा दर 31 टक्क्यांहून बराच जास्त असू शकतो, असा दावाही त्यांनी केला आहे. सर्वेक्षणाच्या ऑडिट अहवालानुसार या अभ्यासात 4.4 लाख नमुन्यांचा समावेश करण्यात आला हे नमुने एका खासगी व्यवस्थेद्वारे संकलित करण्यात आले होते.

    ऑ डिटनुसार विशाखापट्टणममध्ये ज्या लोकांचे सिरो सर्वेक्षणांतर्गत नमुने घेतले त्यांच्यापैकी 36.8 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज मिळाल्या. हा अभ्यास संशोधकांनी आणि आणि थायरोकेयर लॅब्सच्या के. सी निकम यांनी संयुक्तपणे केला होता.

    सिरोच्या सर्वेक्षणासाठी देशभरात 2200 संकलन केंद्रांवर स्वत: हून चाचणी करून घेणाऱ्यांपैकी 31 टक्के लोकांमध्ये कोविड अँटीबॉडीज आढळल्या.
    सर्व वयोगटातील महिलांमध्ये पॉझिटीव्हीटीचा दर 35 टक्के होता,

    तर पुरुषांमध्ये तो 30 टक्के होता. ज्या भागातील लोकांना लहानपणी देवी रोगावरील लस देण्यात आली होती, अशा लोकांमध्ये हा दर कमी आढळला.
    इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजीव जयदेवन म्हणाले की, पुण्यात सर्वाधिक सर्वाधिक 69% सिरो पॉझिटिव्हिटी आढळली.

    यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील आकडेवारी मिळवल्यास हा दर आणखी वाढेल.विविध शहरांमध्ये संक्रमणासाठी लागणारा वेळ आणि संक्रमण सर्वाधिक असण्याचा वेळ वेगवेगळा असल्याचे पाहायला मिळाले आहे.

    मागील वर्षी जून ते डिसेंबरमध्ये दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक संक्रमण झाल्याचे पाहायला मिळाले होते, तर चेन्नईमध्ये जुलैमध्ये संक्रमण सर्वाधिक होते. पुण्यामध्ये सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते,

    पूर्ण देशाचा विचार केल्यास मागील वर्षी सप्टेंबर महिन्याच्या मध्यात सर्वाधिक संक्रमण पाहायला मिळाले होते, असे जयदेव म्हणाले.

    In the first wave in Pune, 69 per cent citizens were exposed in Corona, Siro survey

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा