कोरोनाच्या संकटामुळे राज्यात लॉकडाऊनची भीती आहे. मात्र, कॉँग्रेस या काळातही निधीवाटपातील दुजाभावाचे रडगाणे गात आहे. यासाठी कॉँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्यासह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. In the Corona crisis, Congress weeps over the allocation of funds
विशेष प्रतिनिधी
मुंबई: कोरोनाच्या संकटामुळे राज्यात लॉकडाऊनची भीती आहे. मात्र, कॉँग्रेस या काळातही निधीवाटपातील दुजाभावाचे रडगाणे गात आहे. यासाठी कॉँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्यासह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.
राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या तीन पक्षांच्या सरकारमध्ये काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळत असल्याची तक्रार कॉँग्रेस सातत्याने करत आहे. काँग्रेसला निर्णयप्रक्रियेत फारसे स्थान दिले जात नाही. सरकारमध्ये किंमत नाही, असे म्हटले जाते. याबाबत शुक्रवारी झालेल्या कॉँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाली होती.
अनेक मंत्र्यांसह कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आपला अनुभव सांगितला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे यावेळी उपस्थित होते.
एच. के. पाटील यांनी पत्रकारांना बैठकीतील चर्चेची माहिती दिली. ते म्हणाले, काँग्रेस मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत विविध मुद्यावर चर्चा झाली होती. त्यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा केली. निधी वाटपाबाबत काँग्रेसचे काही आक्षेप होते, ते मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
तसेच, किमान समान कार्यक्रमाबाबत प्रत्येक पक्षाच्या दोन नेत्यांनी एकत्रित बसून आढावा घेतला पाहिजे, अशीही मागणी करण्यात आली. किमान समान कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी एक समन्वय समिती नेमण्यात येणार आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाली.
In the Corona crisis, Congress weeps over the allocation of funds
महत्त्वाच्या बातम्या
- भारत, चीन सोबत नासाने शेअर केला मंगळ मोहिमेचा डेटा, अंतराळातील संभाव्य अपघात टळणार
- एप्रिलच्या मध्यात महाराष्ट्रात होणारा कोरोनाचा विस्फोट, संशोधकांचे भाकीत, मेच्या अखेरपासून बाधितांचे प्रमाण घटणार
- काँग्रेसमुक्त भारत हवाय मग माकपमुक्त भारत का नको? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल
- धर्मनिरपेक्ष केरळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघासमोर झुकणार नाही, मुख्यमंत्री पी. विजयन यांचा घणाघात
- Corona In Maharashtra : महाराष्ट्राने गाठला कोरोना रुग्णांचा उच्चांक, एकाच दिवसात तब्बल ४९,४४७ नवीन रुग्णांची नोंद
- मालीत शस्त्रसज्ज जिहादींनी केलेल्या हल्ल्यात चार शांतीदूतांचा करूण मृत्यू