• Download App
    इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वातावरण बिघडवण्याचा होतोय प्रयत्न! In the background of Israel Hamas war there is an attempt to spoil the atmosphere in Pune

    इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वातावरण बिघडवण्याचा होतोय प्रयत्न!

    शहरात चार भागात पायाचे ठसे असणारे इस्रायली झेंडे लावण्यात आले; पोलिसांकडून गुन्हा दाखल करत तपास सुरू

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : इस्रायल आणि पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमास यांच्यात मध्यपूर्वेत सुरू असलेले युद्ध संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे. त्याचा परिणाम जगाच्या कानाकोपऱ्यात दिसून येत आहे. दरम्यान भारतामध्येही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न  काही जणांकडूनन केला जात आहे.  In the background of Israel Hamas war there is an attempt to spoil the atmosphere in Pune

    त्यात आता पुण्यात इस्रायलचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर इस्रायली झेंडे चिकटवण्यात आले असून, या झेंड्यांवर पायाचे ठसेही आढळून आले आहेत. पुण्यातील चार भागात हे झेंडे चिकटवण्यात आले होते.

    पुणे याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून चार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न कोण करत आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. खरे तर पुण्यात इस्त्रायली नागरिकांचे एक मोठे सिनेगॉग, म्हणजे त्यांचे धार्मिक स्थळ आहे. पोलिसांनी तिथे सुरक्षाही वाढवली आहे.

    In the background of Israel Hamas war there is an attempt to spoil the atmosphere in Pune

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांची मोठी माघार; कमकुवत रुपया, मंदावलेली वाढ आणि महागड्या शेअर्समुळे भारतावरील विश्वास डळमळला

    पवार + ठाकरे + ममतांच्या डोक्यात भरली होती पंतप्रधान पदाची हवा; पण त्यांना टिचभर प्रादेशिक पक्ष टिकवता येईनात!!

    संपूर्ण महाराष्ट्रातले ग्रामीण रस्ते सुधारणार; ५०० दशलक्ष डॉलर्स आणि राज्य सरकारचा ८७०० कोटींच्या निधीला मंजुरी