पोलीस पथक पकडायला आले आहे हे समजताच शक्तीसिंग बावरी याने तेथील एका समाजातील लोकांना एकत्र करुन पोलिसांविरुद्ध भडकावले.In Pune, a mob attacked a police squad, injuring a police officer and staff
विशेष प्रतिनिधी
पुणे : येरवडा येथील कोते वस्ती येथे सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने हल्ला केला. यावेळी पोलिसांनी स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार केला.ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.दरम्यान या घटनेत एक पोलीस अधिकारी व कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा येथील कोते वस्ती येथे सर्व धर्म समभाव सोसायटी ही म्हाडाची इमारत आहे.दरम्यान येथील नागरिकांना शक्तीसिंग सुरजसिंग बावरी (वय २२) हा गुन्हेगार व त्याचे साथीदार त्रास देत होते.म्हणून येथील नागरिकांनी याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन माहिती दिली.
त्यानुसार येरवडा पोलीस ठाण्यातील पथक शक्तीसिंगला पकडायला तेथे गेले होते.पोलीस पथक पकडायला आले आहे हे समजताच शक्तीसिंग बावरी याने तेथील एका समाजातील लोकांना एकत्र करुन पोलिसांविरुद्ध भडकावले. दरम्यान हा जमाव पोलिसांवर चाल करुन आला. यामध्ये एक पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि स्वसंरक्षण करण्यासाठी पोलिसांनी हवेत एक राऊंड फायर केला. गोळीबाराचा आवाज ऐकल्यावर जमाव पांगला. त्यानंतर पोलिसांनी शक्तीसिंग याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान येरवडा पोलीस ठाण्यात शक्तीसिंगवर गुन्हा दाखल करण्यात आला.
In Pune, a mob attacked a police squad, injuring a police officer and staff
महत्त्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलनाचा चेहरा खलिस्थानचा समर्थक, सार्वमत २०२० च्या प्रचारासाठी पोलीसांनी केली अटक
- महाराष्ट्रात कायद्यात बदलाची तयारी पण ममतांनी थेट कुलगुरूंच्या नियुक्तीच टाकल्या करून, राज्यपालांनी दिली कारवाईचा इशारा
- ममता बॅनर्जींविरुद्ध मला राज्यपाल चिथावतात; तृणमूल खासदार सौगता रॉय यांचा आरोप
- अनिवासी भारतीय, परदेशी नागरिकांना मालमत्तेच्या खरेदी-विक्रीसाठी रिझर्व्ह बॅँकेच्या परवानगीची गरज नाही
- समलैंगिक संबंधांना विरोध केल्याने अभिनेत्री सोनम सुधीर मुनगंटीवारांना म्हणाली अडाणी