• Download App
    महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारचा अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना दरमहा ३००० - ३५०० रूपयांचा विशेष भत्ता जाहीर|In Maharashtra, the Thackeray-Pawar government announced a special allowance of Rs 3,000-3,500 per month for minority students

    महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारचा अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना दरमहा ३००० – ३५०० रूपयांचा विशेष भत्ता जाहीर

    वृत्तसंस्था

    मुंबई – महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारने आज अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी दरमहा ३००० आणि ३५०० रुपये विशेष भत्ता देण्याची घोषणा केली. महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नबाब मलिक यांनी हे विशेष भत्ते देण्याचे जाहीर केले आहे.In Maharashtra, the Thackeray-Pawar government announced a special allowance of Rs 3,000-3,500 per month for minority students

    जे अल्पसंख्यांक समूदायाचे विद्यार्थी अल्पसंख्यांक डिपार्टमेंटच्या होस्टेलमध्ये शिक्षणासाठी राहात असतील, त्या सर्वांना दरमहा ३००० रूपयांचा भत्ता दिला जाणार आहे. या विशेष भत्त्यासाठीचा सगळा निधी राज्य सरकारचे अल्पसंख्यांक खाते देणार आहे.



    अ, ब आणि क वर्ग महापालिका तसेच विभागीय शहरातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक रक्कम ३ हजार ५०० रुपये तर जिल्हा आणि तालुकास्तरावरील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा रक्कम ३००० रुपये देण्यात येणार आहेत.

    अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली असून त्यामध्ये राहणाऱ्या आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना त्यांच्या आहाराकरिता ही रोख रक्कम देण्यात येणार आहे. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, असे ट्विट नबाब मलिक यांनी केले आहे.

    In Maharashtra, the Thackeray-Pawar government announced a special allowance of Rs 3,000-3,500 per month for minority students

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!