• Download App
    राज्यातील कारागृहात लसीकरण मोहीम; आतापर्यंत तीन हजार कैद्यांना डोस |In maharashtra jail Coronavirus Vaccine drive is taken, Three thousand prisoners got Vaccine

    राज्यातील कारागृहात लसीकरण मोहीम; आतापर्यंत तीन हजार कैद्यांना डोस

    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्यातील कारागृहांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी कारागृह प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्या अंतर्गत विविध कारागृहांत असलेल्या दोन हजार 869 कैद्यांना कोरोनाविरोधी लस देण्यात आली आहे. In maharashtra jail Coronavirus Vaccine drive is taken, Three thousand prisoners got Vaccine

    राज्यात 46 कारागृहे आहेत. या कारागृहांमध्ये एकूण 34 हजार 281 कैदी आहेत. त्यापैकी दोन हजार 869 कैद्यांना आतापर्यंत कोरोनाची लस देण्यात आली आहे.



    त्यात अंडर ट्रायल दोन हजार 93 आणि शिक्षा झालेल्या 996 कैद्यांचा समावेश आहे. उर्वरित कैद्यांचे देखील लवकरात लवकर लसीकरण करण्यात येणार आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

    येरवडात कारागृहात सर्वाधिक लसीकरण

    राज्यातील अन्य कारागृहांच्या तुलनेत पुण्याच्या येरवडा कारागृहात सर्वाधिक म्हणजे 447 कैद्यांना लस दिली आहे. त्यानंतर कोल्हापूर (403), नागपूर (390) कारागृहात सर्वाधिक कैद्यांना लस देण्यात आली आहे.

    In maharashtra jail Coronavirus Vaccine drive is taken, Three thousand prisoners got Vaccine

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मराठा आंदोलनामुळे मुंबईत वाहतूक कोंडी; मुंबई पोलिसांनी जारी केली ट्रॅफिक ॲडव्हायझरी!!

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंच्या गणपतीचे दर्शन; ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीवर लगावला टोला

    Ramdas Athawale : मंत्री रामदास आठवलेंचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा; रिपाइंचा ठराव मंजूर